मुंबई पोलिसांनी भररस्त्यावर काढली बारबालांची परेड, VIDEO व्हायरल

मुंबई पोलिसांनी भररस्त्यावर काढली बारबालांची परेड, VIDEO व्हायरल

चौकीत गेल्यावर पोलिसांनी बारबालांचे आधारकार्ड, नोकरनामा आदींची पडताळणी करून खात्री केली

  • Share this:

मुंबई, 11 डिसेंबर : ऑर्केस्ट्रा बारमध्ये मद्यपींना बारच्या आड खास पोशाखात अश्लील हावभाव करत नाचणाऱ्या बारबालांचे व्हिडिओ अनेकवेळा पाहायला मिळतात. मात्र, पोलिसांनी एका बारवर छापा टाकून ताब्यात घेतलेल्या बारबालांची भर रस्त्यावरच परेड काढली.

काशिमीरा पोलीस ठाण्याचे नवनियुक्त निरीक्षक राम भालसिंग आणि त्यांच्या पोलीस पथकाने शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भाईंदरमधील ९ आॅर्केस्ट्रा बारवर धाडी टाकल्या. बारमध्ये काम करणाऱ्या बारबालांमध्ये काही बांगलादेशी तरुणी असल्याचा पोलिसांना संशय होता. बारबालांचा नोकरनामा, नोंदणी आदींचीदेखील पडताळणी यानिमित्ताने केली गेली. या बारमधून ताब्यात घेतलेल्या ५५ ते ५० बारबालांना पडताळणीसाठी दहिसर चेकनाका येथील पोलीस चौकीत न्यायचे होते. परंतु, या भागात मेट्रोचे सुरू असलेले काम आणि वाहतूक कोंडी पाहता त्यांना चालतच पोलीस चौकीत नेण्यात आले. याशिवाय, इतक्या मोठ्या संख्येने असलेल्या बारबालांना नेण्यासाठी पोलिसांकडे पुरेशी वाहनेसुद्धा नव्हती.

चौकीत गेल्यावर पोलिसांनी बारबालांचे आधारकार्ड, नोकरनामा आदींची पडताळणी करून खात्री केली. पडताळणी केल्यावर बारबालांना सोडून देण्यात आले. बारबाला रस्त्यावरून जात असल्याचा प्रकार रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाश्याने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच काशिमिरा पोलिसांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे.या परेडवर टीका होत असून, याप्रकरणी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते आणि वकिलांनीही या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतलीच होती तर वाहनांचीही सोय त्यांनी करायला हवी होती असे त्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राम भालसिंग यांना विचारणा केली असता, वाहतूक कोंडी आणि वाहनं नसल्यानं बारबालांना चालत नेऊन त्यांची पडताळणी केली आणि  त्यांना सोडून दिल्याचं त्यांनी सांगितलं.

 

Published by: sachin Salve
First published: December 11, 2019, 8:56 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading