CSMTचा पुल कोसळला: एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईकर पुन्हा हादरले

CSMTचा पुल कोसळला: एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईकर पुन्हा हादरले

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथीर रेल्वे स्थानकाबाहेरुन कामा रुग्णालयाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा भाग कोसळून अनेक जण जखमी झाले आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 मार्च: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील रेल्वे स्थानकाबाहेरुन कामा रुग्णालयाकडे जाणाऱ्या पादचारी पुलाचा भाग कोसळून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या या घटनेमुळे मुंबईकरांना एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकावर दुर्घटनेची आठवण आली. या पुलाचा 60 टक्के भाग कोसळला असल्याचे समजते.

पाहा: मुंबईच्या CSMT जवळील पादचारी पूल अपघाताचा पहिला VIDEO

काय झाले नेमके?

सीएसएमटीकडून कामा रुग्णालय आणि किला कोर्टाकडे जाणाऱ्या पुलाचा अर्धा कोसळला. संध्याकाळी 7.30च्या सुमारास ही घटना घडली. यामुळे जे.जे.फ्लायओव्हरकडे जाणारा तसेच फोर्टकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. टाइम्स ऑफ इंडिया इमारतीजवळ हा पुल आहे. या पुलावरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मते पुलावरुन जाताना हादरे बसत होते. ऐन गर्दी झालेल्या या दुर्घटनेमुळे जखमींची संख्या अधिक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पुलाची निर्मिती मुंबई पालिकेने केली असून त्याच्या देखभालीची जबाबदारी पालिकेकडेच आहे. हा पुल जवळ जवळ 100 वर्ष जुना आहे. या पुलाचे अनेक वर्षापासून अॅडिट झाले नसल्याचा दावा येथील नगरसेवक सुजाता सानप केले आहे. हा पुल धोकादायक आहे आणि तो दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार पूलाचे अॅडीट झाल्यानंतर त्यात किरकोळ दुरुस्ती असल्याचे म्हटले होते.

एल्फिन्स्टन दुर्घटनेची आठवण

29 सप्टेंबर रोजी मुंबईतील मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी 23 जण ठार झाले होते. तर 39 जण जखमी झाले होते.

संबंधित बातम्या:

PHOTO थरार....असा कोसळला CSMT जवळचा पूल

...आणि पुलावरचे लोक खाली कोसळले

First published: March 14, 2019, 8:19 PM IST

ताज्या बातम्या