सलाम! भरपावसात बजावलं कर्तव्य; जखमी बापलेकीला मुंबई पोलिसानं सुरक्षित स्थळी हलवलं, घटनेचा VIDEO व्हायरल

Mumbai Rain: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झालेल्या बापलेकीला पाण्यातून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे.

Mumbai Rain: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतं आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झालेल्या बापलेकीला पाण्यातून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे.

  • Share this:
    मुंबई, 19 जुलै: मागील तीन ते चार दिवसांपासून मुंबईला पावसानं झोडपून (Heavy rainfall in mumbai) काढलं आहे. शुक्रवारी मध्य रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. तर अनेकाच्या घरात पाणी शिरलं आहे. याशिवाय चेंबूर आणि विक्रोळी याठिकाणी इमारतीच्या भींती पडून मोठी दुर्घटना देखील घडली आहे. पण अशा या रिपरिप पडणाऱ्या पावसात मुंबई पोलीस (Mumbai Police) आणि महानगरपालिकेचे कर्मचारी रात्रीचा दिवस करत आपलं कर्तव्य बजावत आहेत. स्वतः पावसात भीजत नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी ते मदत करत आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral video) होतं आहे. ज्यामुळे मुंबई पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झालेल्या बापलेकीला पाण्यातून सुरक्षित स्थळी घेऊन जाताना दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ मुंबई पोलिसांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी आम्ही ड्युटीवर आहोत याची जाणीव देखील करून दिली आहे. हेही वाचा-धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकांच्या सुटकेचा थरारक VIDEO मुंबई पोलिसांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलेल्या कॅप्शननुसार, संबंधित बापलेकीला मदत करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव राजेंद्र शेगर असून ते पोलीस नाईक पदावर कार्यरत आहेत. सध्या त्यांची ड्युटी कांदीवली वाहतूक पोलिसांत आहे. दरम्यान काल झालेल्या मुसळधार पावसामुळे कांदवली परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. रस्तेही तुडुंब भरल्यानं अनेक ठिकाणी पाणी गुडघ्यापर्यंत लागत आहे.
    हेही वाचा-VIDEO: जळगावजवळ पाम तेलाचा टँकर उलटला; तेलावर डल्ला मारण्यासाठी लोकांची झुंबड अशास्थितीत एक जखमी व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन पाण्यातून मार्ग काढत असल्याचं पोलीस नाईक राजेंद्र शेगर यांच्या निदर्शनास आलं. त्यांनी त्वरित त्यांना मदतीचा हात दिला. आणि लहान मुलीला उचलून घेत, दोघांनाही सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होतं असून अनेकांनी पोलीस नाईक राजेंद्र शेगर यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published: