मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /कोविड नियमांचं उल्लंघन केल्याने मागितली दीड लाखांची खंडणी; BMCच्या 4 क्लीन अप मार्शलला अटक

कोविड नियमांचं उल्लंघन केल्याने मागितली दीड लाखांची खंडणी; BMCच्या 4 क्लीन अप मार्शलला अटक

दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 क्लीनअप मार्शलला अटक केली आहे.

दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 क्लीनअप मार्शलला अटक केली आहे.

दीड लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 4 क्लीनअप मार्शलला अटक केली आहे.

मुंबई, 16 मे: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) झपाट्याने होत असल्याचं पहायला मिळत आहे. या काळात नागरिक नियमाचे पालन करत नसल्यामुळे सरकारच्या वतीने 31 मे पर्यंत लॉकडाऊन (Lockdown) लावण्यात आलेला आहे. या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) वतीने कंत्राटी पद्धतीने क्लीन-अप मार्शलची (Clean up marshals) नेमणूक मुंबई प्रभागांमध्ये करण्यात आली आहे. मात्र कोरोनाचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांकडून हे क्लीन-अप मार्शल खंडणीच्या (extortion) स्वरूपात पैशांचे मागणी करत असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.

अंधेरी पूर्वेत एमआयडीसी परिसरामधील कंपन्यांमध्ये अशाच एका मालकाकडून या क्लीन अप मार्शल मास्क न घातल्यामुळे आणि नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दीड लाख रुपयांची खंडणी मागितली होती. ज्यात कंपनी मालकाने 21 एप्रिल रोजी दीड लाख ऐवजी 20000 ची खंडणी दिली होती मात्र या आरोपीने काल संध्याकाळी पुन्हा त्याच कंपनीमध्ये धाड टाकत 1 लाखांची खंडणी मागितली. कंपनी मालकाने या क्लीनअप मार्शलच्या विरोधात तक्रार करून सर्व प्रकारच्या माहिती एमआयडीसी पोलिसांना दिली.

वाचा: आधी प्रेमाचं नाटक मग पाठित खंजीर; श्रीमंत व्यावसायिकाचे अश्लील व्हिडीओ बनवून केली कोट्यवधींची मागणी

एमआयडीसी पोलिसांनी 5 क्लीन-अप मार्शलच्या विरोधात गुन्हा नोंद करून बीएमसीच्या 4 क्लीन-अप मार्शलला अटक केली आहे. एमआयडीसी पोलिसांनी अटक केलेले क्लीनअप मार्शलमध्ये प्रमोद माने, विशाल सूर्यवंशी, दादासाहेब गोडसे, आकाश गायकवाड या चार आरोपीना अटक केली आहे. तर यातील एक आरोपी फरार असून त्याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

या सर्व आरोपीना न्यायालयात हजर केले असताना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसेच यांनी आणखी कोणत्याही ठिकाणी अश्याप्रकारे लूट केली आहे का याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे असे पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी यांनी सांगितले.

First published:

Tags: BMC, Coronavirus, Mumbai