• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • बनावट लसीकरण : मुंबई पोलिसांनी पाचव्या आरोपीला पकडलं, रेल्वेनं बिहारला होता निघाला

बनावट लसीकरण : मुंबई पोलिसांनी पाचव्या आरोपीला पकडलं, रेल्वेनं बिहारला होता निघाला

काही दिवसांपूर्वी मुंबईत कांदिवली येथे झालेल्या बनावट कोरोना लसीकरणाप्रकरणी (Fake Corona vaccination) आता पाचव्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी मुंबईहून बिहारला पळून निघाला होता.

 • Share this:
  मुंबई, 19 जून : काही दिवसांपूर्वी मुंबईत कांदिवली येथे झालेल्या बनावट कोरोना लसीकरणाप्रकरणी (Fake Corona vaccination) आता पाचव्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा आरोपी मुंबईहून बिहारला पळून निघाला होता तितक्यात पोलिसांनी त्याला एका रेल्वे स्थानकावरूनच पकडले. रेल्वे क्रमांक 02141 पाटलिपुत्र मुंबई सुपरफास्ट रेल्वेने हा आरोपी मुंबईहून बिहारला निघाला होता. याबाबत मुंबई पोलिसांनी जबलपूर पोलिसांना माहिती दिली होती. कारण, मुंबईतून गाडी पुढे गेली होती. त्यामुळे या आरोपीला सतना (मध्य प्रदेश) स्थानकावर पकडण्यात आले. मुंबई पोलिसांनी (Mumbai police) आरोपीच्या केलेल्या वर्णनावरून सतना स्थानकावर पोलिसांनी करीम अली नावाच्या व्यक्तीला पकडले. त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी मुंबईचे कांदिवली पोलीस सतना जीआरपी पोलीस ठाणे येथे दाखल झाले आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस चौकशीत आरोपीनं सांगितलं की, आपण केसीईपी इन्स्टिट्यूशन मुंबई येथे नर्सिंगचा कोर्स केला होता. डॉक्टर महेंद्र यांच्या सांगण्यावरून आपण लस टोचण्याचे काम केल्याचे त्याने सांगितले. सरगना शिवम रुग्णालयाचे डॉक्टर मनिष त्रीपाठी यांच्या सांगण्यावरून काम सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या बनावट लसीकरण प्रकरणात पाच आरोपींना दोषी पकडण्यात आले होते, त्यातील जवळपास सर्वांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, 30 मे रोजी हिरानंदानी सोसायटीमध्ये लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. या शिबिरात 490 नागरिकांना कोविशिल्ड लस देण्यात आली. एकाने सोसायटीतील सदस्यांची भेट घेऊन स्वतःला कोकीलाबेन अंबानी हॉस्पिटलचा प्रतिनिधी असल्याचं सांगितलं होतं. तसंच सोसायटीत लसीकरण सुविधा उपलब्ध करून देण्याचं सांगितलं होतं. लसीकरणानंतर सर्वांकडून रोख पैसे घेतले होते. महत्त्वाचे म्हणजे लस देताना कोणालाही फोटो काढून न दिल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं. हे वाचा - मुंबईतील पॉश सोसायटीत बोगस लसीकरण झाल्याची भीती; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात लस दिल्यानंतर नागरिकांना लसीकरण झाल्याचा मेसेज आला नाही. त्याचबरोबर वेगवेगळ्या रुग्णालयांची प्रमाणपत्र देण्यात आली होती. नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला होता. सुरूवातीला नागरिकांना वेगवेगळ्या तारखा आणि ठिकाणं असलेली प्रमाणपत्र देण्यात आली होती. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आता पाच जणांना ताब्यात घेतलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published: