मुंबई पोलिसांना 'hats off'! वरळी सीफेसमध्ये बुडालेल्या वृद्धाला जीव पणाला लावून वाचवलं, पाहा VIDEO

मुंबई पोलिसांना 'hats off'! वरळी सीफेसमध्ये बुडालेल्या वृद्धाला जीव पणाला लावून वाचवलं, पाहा VIDEO

मुंबई पोलिसांनी या वृद्ध व्यक्तीसाठी कपडे आणि खाण्याची व्यवस्था केली आहे.

  • Share this:

मुंबई, 31 ऑगस्ट : कोरोनाच्या काळात अहोरात्र पोलीस काम करत आहेत. याशिवाय अडीनडीला आणि गरजेला प्रत्येकाच्या मदतीला धावून येणाऱ्या मुंबई पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून वृद्ध तरुणाचे प्राण वाचवले आहेत. वरळी सी-फेस इथे एक वृद्ध व्यक्ती पाण्यात बुडत असल्याची माहिती मोबाईल-1 व्हॅनला मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलीस नाईक अजय मते आणि पोलीस शिपाई अजय गवांदे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या व्यक्तीला पाण्यात बुडताना पाहिलं आणि तातडीनं त्यांनी सुरक्षितपणे पाण्याबाहेर काढलं आहे. या व्यक्तीला पोलिसांनी अन्न आणि काही कपडेही दिले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी ट्वीट करून दिली आहे.

हे वाचा-'ज्या नेत्यांचा श्वास मंदिरात घुसमटतो व नाइट लाइफमुळे फुलतो ते...'; भाजप आक्रमक

कोरोनाच्या काळात मुंबई पोलीस अहोरात्र आपलं कर्तव्य बाजवत आहेत. हा वृद्ध वरळी सेफ इथे पाण्यात कसा बुडाला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही. मात्र मुंबई पोलिसांनी त्याला कपडे आणि खाण्याची व्यवस्था केली आहे. पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून या वृद्ध व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. पुन्हा एकदा सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या कामाचं कौतुक होत आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: August 31, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या