CABला विरोध, महाराष्ट्रात IPS अधिकारी अब्दुर रहेमान यांचा राजीनामा

CABला विरोध, महाराष्ट्रात IPS अधिकारी अब्दुर रहेमान यांचा राजीनामा

नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यांचं आणि धर्मनिरपेक्ष तत्वाच्या हे विरुद्ध असून त्यामुळे सामाजिक एकता मोठा धोका निर्माण झाल्याचं सांगत त्यांनी नोकरी सोडत असल्याचं सांगितलंय.

  • Share this:

वैभव सोनावणे, मुंबई 11 डिसेंबर : नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याने मोदी सरकारचा मोठा विजय झालाय. मात्र या विधेयका विरोधात महाराष्ट्रात IPS अधिकाऱ्याने राजीनामा दिलाय. मुंबईतले अधिकारी अब्दुर रहेमान यांनी हे विधेयक नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन करणारे आणि घटना विरोधी असल्याचे सांगत आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. नागरिकांच्या धार्मिक स्वातंत्र्यांचं आणि धर्मनिरपेक्ष तत्वाच्या हे विरुद्ध असून त्यामुळे सामाजिक एकता मोठा धोका निर्माण झाल्याचं सांगत त्यांनी नोकरी सोडत असल्याचं सांगितलंय. रहेमान यांच्या राजीनाम्यामुळे प्रशासनात खळबळ उडालीय. या विधेयकाला देशभर प्रचंड विरोध झाला होता. अशा प्रकारे विरोध करत राजीनामा देणारे रहेमान हे पहिलेच अधिकारी आहेत. रहेमान हे महाराष्ट्र मानवी हक्क आयोगात  स्पेशल IG म्हणून नियुक्त होते. त्यांनी मुस्लिमांच्या स्थितीवर एक पुस्तकही लिहिलं आहे.

राज्यसभेत विधेयक मंजूर

वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झालं. या आधी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. मात्र राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्याने काय होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज्यसभेत आज सहा तासांपेक्षा जास्त तास या विधेयकावर वादळी चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या सर्व आरोप आणि आक्षेपांना सडेतोड उत्तर दिलं. त्यावर अनेकदा वादही झालेत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या विधेयकाला आक्षेप घेत अमित शहांना टोले लगावले. मात्र शेवटी सभागृहातून सभात्याग केल्याने त्याचा थेट फायदा सरकारला झाला.

लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना पाठिंबा देणार नाही असं म्हटलं होतं. त्यामुळे शिवसेनेच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेने सभात्याग केल्याने सरकारला त्याचा फायदा झाला. विधेयकाच्या बाजूने 125  तर विरोधात 105 एवढी मतं पडली. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सरकारचा मोठा विजय झाल्याचं मानलं जातंय. विरोधी पक्षांनी विधेयकावर 14 प्रस्ताव दिले होते मात्र हे सर्व प्रस्ताव फेटाळले गेले.

वादळी चर्चा

अमित शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रश्नावरून मोदी सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना तुमच्या देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला नको असं सांगितलं. या सगळ्या प्रश्नांना अमित शहा यांनी शेवटी सडेतोड उत्तर दिलं. या बिलावरून काँग्रेस आणि काही पक्ष संभ्रम निर्माण करून मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केली जात असल्याचा पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला. तर एका रात्रीत भूमिका का बदलली असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 11, 2019 09:24 PM IST

ताज्या बातम्या