मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बापरे...इतका श्रीमंत आहे हा गँगस्टर! जिकडे बघावं तिकडे पैसेच पैसे, मुंबई पोलिसही चक्रावले

बापरे...इतका श्रीमंत आहे हा गँगस्टर! जिकडे बघावं तिकडे पैसेच पैसे, मुंबई पोलिसही चक्रावले

एका गँगस्टरनं सोशल मीडियावर लाखो रुपयांसोबतचा आपला एक व्हिडिओ (Gangster Money Video) अपलोड केला आहे. पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची दखल घेतली असून गँगस्टरला नोटीस पाठवण्यात आली आहे.

  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 29 मे : मुंबईच्या डोंगरी भागाता राहाणाऱ्या एका गँगस्टरनं सोशल मीडियावर लाखो रुपयांसोबतचा आपला एक व्हिडिओ (Gangster Money Video) अपलोड केला आहे. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी (Mumbai Police) या प्रकरणाची दखल घेतली असून गँगस्टरला नोटीस पाठवण्यात आली आहे. नोटीसमध्ये पोलिसांनी गँगस्टरला लाखो रुपये कसे आले, याबाबतची संपूर्ण माहिती मागितली आहे.

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती आणि त्याच्या मांडीवर एक लहान मुलगा बसलेला दिसत आहे. व्हिडिओमध्ये या व्यक्तीच्या चारही बाजूला पाचशे आणि 2000 रुपयांच्या नोटांच्या गाड्या आहेत. इतकंच नाही तर या लहान मुलाच्या हातातही पैशाच्या गाड्या आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नेटकरीही हैराण आहेत, की इतका पैसा कसा आणि कुठून आला.

VIDEO: पळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिला आरोपीचा थरारक व्हिडिओ

पोलिसांनी या व्हिडिओचा तपास सुरू केल्यावर असं समोर आलं, की हा व्हिडिओ मुंबईच्या डोंगरी भागात राहाणाऱ्या शम्स सय्यद नावाच्या एका गुंडाचा आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शम्स सय्यदविरोधात मुंबईच्या वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या व्यक्तीला चौकशीसाठी बोलावलं आहे.

मुंबई पोलीस डीसीपी एन चैतन्य यांनी सांगितलं, की या व्हिडिओबाबत आम्ही त्या व्यक्तीला नोटीस पाठवली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीला उत्तर मागितलं गेलं आहे, की त्याच्याकडे इतके पैसे कसे आले? त्यांनी सांगितलं, की शम्स सय्यदविरोधात संपूर्ण मुंबईमध्ये दहापेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. यातील एक प्रकरण हत्येचा प्रयत्न केल्याचं .

First published:

Tags: Money, Video viral