Home /News /mumbai /

500 रुपयांचा दंड थेट 5 ते 10 हजारांवर, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे दंड कित्येक पटीने वाढवले

500 रुपयांचा दंड थेट 5 ते 10 हजारांवर, मुंबई पोलिसांनी वाहतुकीचे दंड कित्येक पटीने वाढवले

मुंबईत अल्पवयीन मुलांना गाडी चालवताना पकडले गेल्यास 500 रुपयांचे दंड होता. पण आता हाच दंड थेट 5 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच विना लायसन्स दंड 500 रुपयांवरुन 10 हजार रुपयांवर करण्यात आला आहे.

मुंबई, 13 डिसेंबर : मुंबईत जर आता तुम्ही गाडी चालवणार असाल तर सावधान! कारण मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) वाहतूक नियम (Traffic Rules) मोडणाऱ्यांना चाप बसवण्याकरता दंडाची रक्कम तब्बल 1 हजार ते 10 हजार पटीने वाढवलीय. यामुळे मुंबईत गाडी चालवताना जर तुम्ही वाहतूकीचे नियम मोडले तर तुमचा खिसा रिकामा झालाच म्हणून समझा. त्यात आता संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही (CCTV) असल्याने तुम्ही वाहतूक पोलिसांना चकमा देवू शकत नाही. कारण मुंबईत डिजीटल चलन आकारले जाते.

मुंबई पोलिसांनी कोणता दंड किती पटीने वाढला?

- मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतूक नियंमांचे दंड रक्कम वाढवली आहे. मात्र रिक्षा-टॅक्सी चालकांनी भाडे नाकारल्यास जो दंड 200 रुपये होता तो 50 रुपये करण्यात आलाय. - शहरात अल्पवयीन मुलांना गाडी चालवताना पकडले गेल्यास 500 रुपयांचे दंड होता. पण आता हाच दंड थेट 5 हजार रुपये करण्यात आला आहे. तसेच विना लायसन्स दंड 500 रुपयांवरुन 10 हजार रुपयांवर करण्यात आला आहे. वाहन नोंदणीशिवाय गाडी चालवल्यास दंड 1 हजारवरुन 2 हजार करण्यात आला आहे. अवैध लायसन्स दंड 500 वरुन 5 हजार रुपयांवर करण्यात आला आहे. इन्श्युरन्स दंड 2 हजारच ठेवण्यात आलाय. पण दुसऱ्यांदा पकडल्यास 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. हेही वाचा : बॉलिवूडमधील कपूरनंतर खान कुटुंबातही कोरोना, सलमानची वहिनी पॉझिटिव्ह - विदाऊट नंबर प्लेटचा दंड 200 वरुन 500 रुपयांवर करण्यात आलाय. तर दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 रुपये दंड आकारला जाईल. फॅन्सी नंबर प्लेट दंड 1 हजाराच ठेवण्यात आलाय. विदाऊट हेल्मेट दंड 500 रुपये ठेवण्यात आलाय. मात्र 3 महिने लायसन्स सस्पेंड केले जाईल हा नवीन नियम लागू करण्यात आला आहे. गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना पकडल्यास 200 रुपये वरुन 1 हजार दंड करण्यात आला आहे. तसेच दुसऱ्यांदा पकडल्यास 10 हजार रुपये दंड तर चारचाकी वाहनांकरता हाच दंड पहिल्यांदा 2 हजार आणि दुसऱ्यांदा पकडले गेल्यास 10 हजार करण्यात आलाय. विदाऊट सीट बेल्ट 200 वरुन 500 करण्यात आलाय. तसेच दुसऱ्यांदा सापडल्यास 1500 रुपये दंड आकारण्यात येईल. नो एंन्ट्री 200 चा दंड 500 रुपये करण्यात आलाय. तर दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 रुपये दंड आकारला जाईल. - ट्रिपल सीट 200 वरुन 1 हजार दंड सोबतच 3 महिन्यांकरता करता लायसन्स रद्द करण्यात येईल. ड्रायव्हरला अडथळा होईल असे सामान ठेवून गाडी चालवल्यास 200 वरुन 500 रुपये दंड आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 दंड आकारला जाईल. एक्सट्रा सीट भरल्यास 200 वरुन 500 दंड आणि दुसऱ्यांदा 1500 रुपये आकारण्यात येईल. सिग्नल जम्प 200 वरुन 500 रुपये दंड तर दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 रुपये - प्रखर हेडलाईट, विदाऊट हेडलाईट, विना पार्किंग प्रकाश आणि प्रकाश दिसत नाही यासाठी दंड प्रत्येकी 200 वरुन 500 रुपयांवर करण्यात आलाय. तर दुसऱ्यांदा सापडल्यास 1500 रुपये दंड आकारण्यात येईल - नो हॉर्न झोनमध्ये हॉर्न वाजवल्यास दंड 200 वरुन 500 रुपये करण्यात आलाय. तसेच दुसऱ्यांदा सापडल्यास 2 हजार रुपये दंड आकारला जाईल. - पोलिसांचे वाहतूक निर्देश ऐकले नाही तर 200 वरुन 500 आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 हजार दंड - शर्यत लावणे, वेग मर्यादा याबद्दलचा दंड 2 हजार वरुन 5 हजार करण्यात आलाय. आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 10 हजार रुपये दंड आकारला जाईल. - दुचाकी आणि चारचाकी यांनी ओव्हर स्पीड गाडी चालवल्यास 1 हजार वरुन 1500 ते 4 हजार दंड आखारला जाईल. - क्षमतेपेक्षा जास्त माल भरल्याबद्दल 500 रुपयाचा दंड आता 1 हजार रुपये करण्यात आला आहे. यासोबतच 3 महिने लायसन्स रद्द करण्यात येईल. - रंगीत काच, विना मडगार्ड, विना आरसा, डॅश बोर्डवर टीव्ही लावणे, साऊंड फ्रूफ काच, खराब टायर यासाठीचे दंड 200 रुपये होते. ते आता प्रत्येकी 500 रुपये करण्यात आले आहेत. हेही वाचा : तुम्ही गुगल क्रोम वापरता का? केंद्र सरकारने दिलाय 'हा' धोक्याचा इशारा - विदाऊट वायपरसाठी 200 वरुन 500 रुपये दंड आकारला जाईल. - प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी ओरडल्यास दंड 200 रुपये ते 500 रुपयांपर्यंत आकारला जाईल. - लॅब टॅक्सी चालक ड्रेस नसल्यास 200 रुपये दंड होता. पण आता 500 रुपये दंड आकारला जाईल. - गाडी स्वच्छ नसल्यास, मीटर चालू नसल्यास, 200 रुपये दंड आकारला जायचा. पण आता हाच दंड 500 रुपये करण्यात आला आहे. - दारु पिवून गाडी चालवणे हा दंड 2 हजारच ठेवण्यात आलाय - गाडीचा नंबर अस्पष्ट दिसल्यास 200 वरुन 500 रुपये दंड आणि दुसऱ्यांदा 1500 - इंग्रजीत नंबर प्लेट नसल्यास 200 वरुन 500 रुपये आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 रुपये दंड - पीयूसी एक्सपायरचा दंड 200 वरुन 500 रुपये करण्यात आला आहे. आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 रुपये दंड - गाडीत चालक व्हिडिओ पाहताना दिसल्यास 200 वरुन 500 रुपये दंड आणि दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 दंड - नवीन काही दंड समाविष्ठ करण्यात आलेत - सार्वजनिक ठिकाणी लोकांना अडथळा निर्माण होईल अशी गाडी उभी करणे 500 रुपये दंड, दुसऱ्यांदा पकडल्यास 1500 हजार दंड - एमरजन्सी गाड्यांना अडथळा निर्माण केल्यास 19 हजार दंड - गाडी चालवण्यास अपात्र व्यक्ती गाडी चालवताना पकडले गेल्यास 10 हजार दंड
Published by:sachin Salve
First published:

Tags: Mumbai police

पुढील बातम्या