• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • कोरोना लशींबाबत चिंता वाढली! दोन्ही डोस घेऊनही मुंबई पोलिसाला झाला कोरोना, उपचारादरम्यान मृत्यू

कोरोना लशींबाबत चिंता वाढली! दोन्ही डोस घेऊनही मुंबई पोलिसाला झाला कोरोना, उपचारादरम्यान मृत्यू

राजेश महाजन असं आत्महत्या करणाऱ्या 50 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

राजेश महाजन असं आत्महत्या करणाऱ्या 50 वर्षीय पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे.

मुंबई पोलिसातील एका हेड कॉन्स्टेबलला (head constable) कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस (After taking 2 doses) घेतल्यानंतरही कोरोनाची पुन्हा लागण (infected with corona) झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 मे: सध्या देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वेगाने वाढत आहे. परिणामी कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत (Corona 2nd Wave) असंख्य निष्पाप लोकांचे हकनाक बळी (Corona deaths) जात आहेत. अशात मुंबईतून काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. येथील एका हेड कॉन्स्टेबलला (head constable) कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस (After taking 2 doses) घेतल्यानंतरही कोरोनाची पुन्हा लागण (infected with corona) झाली आहे. लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर एक महिन्यांनी संबंधित हेड कॉन्स्टेबलला कोरोनाची बाधा झाली, ज्यामध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. साहजिकचं कोरोना लशीवर प्रश्नचिन्हही निर्माण झालं आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसोबत देशाची चिंताही वाढली आहे. मुंबई पोलिसातील संबंधित हेड कॉन्स्टेबलचं नाव संदीप तावडे असून ते मॅजिस्ट्रेट न्यायालयात तैनात होते. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत हेड कॉन्स्टेबल संदीप तावडे यांनी 12 फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधात्मक लशीचा पहिला डोस घेतला होता. तर एक महिन्यांनी 13 मार्च रोजी लशीचा दुसरा डोसही घेतला. पण कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जवळपास एक महिन्याने 21 एप्रिल रोजी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. हे वाचा-पोटनिवडणुकीच्या ड्यूटीनंतर शिक्षकासोबत कोरोनाही आला घरी,4 दिवसात कुटुंब उद्धवस्त दरम्यान त्याची कोरोना चाचणी केली असता, त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांना मुंबईतील दहिसर येथील एका कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल केलं. तरीही त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांना दोन -तीन दिवसांनी आयसीयुमध्ये दाखल केलं. याठिकाणी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे त्यांना परत सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आलं. पण यावेळी मात्र त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली. हे वाचा-कोरोनाचा कहर: 18 दिवसात प्रतिष्ठीत विद्यापीठातील 17 प्राध्यापकांचा मृत्यू हेड कॉन्स्टेबलला होता मधुमेहाचा त्रास पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेड कॉन्स्टेबल संदीप तावडे यांचा शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला असून ते मधुमेहाचे रुग्ण असल्याची माहितीही समोर आली आहे. यासाठी ते वेळोवेळी औषधे घेत होते. मृत तावडे आपली पत्नी आणि मुलासोबत दहिसर याठिकाणी राहत होते.
  Published by:News18 Desk
  First published: