'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून!

'कानून के हात..', 11 वर्षांपूर्वी चोरी गेलेले ५ हजार रुपये पोलिसांनी दिले मिळवून!

2007 साली संदेश परब यांचे लोकलमध्ये प्रवास करत असताना चोरट्यांनी 5000 रुपये लांबवले होते.

  • Share this:

आशिष दीक्षित,प्रतिनिधी

मुंबई, 13 नोव्हेंबर : 'कानून के हात बहुत लंबे होते है', या उक्तीला सार्थ ठरवणारा प्रकार मुंबईत घडलाय. तब्बल 11 वर्षांनी चोरट्यांनी चोरलेले 5 हजार रुपये एका इसमाला परत मिळवून देण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. या घटनेनं आनंदासोबत आश्चर्यही व्यक्त केले जात आहे.

2007 साली संदेश परब यांचे विलेपार्ले स्टेशनवर लोकलमध्ये प्रवास करत असताना चोरट्यांनी 5000 रुपये लांबवले होते. संदेश यांनी पैसे चोरी झाल्याची तक्रार अंधेरी रेल्वे पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. मात्र, गेल्या 11 वर्षांत त्याच्या हाती काहीच लागलं नाही.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चोरी करणाऱ्या चोराला शोधून काढले. त्यानंतर पोलिसांनी संदेश परब यांनी दिलेल्या तक्रारीवर पत्ता आणि क्रमांकावर संपर्क साधला पण पत्ता आणि फोन क्रमांक बदलल्यामुळे संदेश यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. पोलिसांनी संदेश परब यांचा पत्ता शोधून काढला आणि चोरीचे पैसे मिळाल्याची माहिती दिली.

ऐन दिवाळीच्या दिवशी पोलिसांनी संदेश यांना त्याचे 5000 रुपये परत मिळवून दिले. तब्बल 11 वर्षांपूर्वी चोरी झालेले पैसे परत मिळाल्यामुळे संदेश यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

===================

First published: November 13, 2018, 8:57 PM IST

ताज्या बातम्या