कमला मिल आगी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलं 2700 पानांचं आरोपपत्र

एकूण 12 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सदोष मनुष्यवधासह अनेक कलमांअंतर्गत आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलं आहे.

Renuka Dhaybar | News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2018 08:33 AM IST

कमला मिल आगी प्रकरणात मुंबई पोलिसांनी दाखल केलं 2700 पानांचं आरोपपत्र

01 मार्च : कमला मिल आगीप्रकरणी मुंबई पोलिसांनी भोईवाडा कोर्टात 2700 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. एकूण 12 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. सदोष मनुष्यवधासह अनेक कलमांअंतर्गत आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आलं आहे.

कमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजो बिस्ट्रो या रेस्टोपबला 29 डिसेंबरच्या रात्री लागलेल्या भीषण आगीत 14 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. मोजोस बिस्ट्रोमध्ये हुक्क्यामुळे ही आग लागली आणि नंतर आगीचा भडका उडून हे दोन्ही रेस्टोपब आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचं अग्निशमन दलाच्या प्राथमिक चौकशीत स्पष्ट झालं होतं. या दुर्घटनेप्रकरणी मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून 12 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर या 12 जणांविरोधात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे.

त्यात वन अबव्ह रेस्टोपबचे तीन मालक कृपेश सिंघवी, जिगर सिंघवी, अभिजीत मानकर, मोजोस बिस्टोचा मालक युग पाठक, कमला मिलचा मालक रमेश गोवानी, सहमालक रवी भंडारी, स्थानिक अग्निशमन केंद्राचे अधिकारी राजेंद्र पाटील, हुक्का पुरवठादार उत्कर्ष विनोद यांचा समावेश होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2018 08:33 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...