मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला ठोकल्या बेड्या

मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला ठोकल्या बेड्या

धक्कादायक बाब म्हणजे फसवणूक करुन मिळवलेल्या पैशांतून हा निर्माता चित्रपट बनवत होता.

  • Share this:

ठाणे, 22 फेब्रुवारी : मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचने एका प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याला बेड्या ठोकल्या आहेत. बाॅलिवूडमध्ये नाव असल्याचा फायदा घेत आपण कोट्यवधी रुपयांचा फायनान्स उपलब्ध करुन देवू शकतो, असं सांगून या चित्रपट निर्मात्याने जवळपास 8 ते 10 लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे. धक्कादायक म्हणजे फसवणूक करुन मिळवलेल्या पैशांतून हा निर्माता चित्रपट बनवत होता.

भडास, ओव्हर टाइम, लव्ह फिर कभी, रण बंका, सस्पेन्स आणि साक्षी हे चित्रपट सोनेरी पडद्यावर आले. हे सर्वच्या सर्व सिनेमे फ्लाॅप झाले. पण या चित्रपटांचा निर्माता दिग्दर्शक अजय यादव याने आपली एक वेगळी छाप बाॅलिवूडमध्ये सोडली. विशेष करुन नवीन कलाकारांना काम देणारा निर्माता/दिग्दर्शक अशी ओळख अजय यादव ने निर्माण केली होती. मात्र याच्या उलट एक वेगळी ओळख अजय यादवची होती, जी म्हणजे फसवणूक करणारा चित्रपट निर्माता.

मोठा आर्थिक पुरवठा मी करु शकतो, माझी एक एंग्लो फायनान्स इंटरप्रायजेस कंपनी आहे, असं सांगून या चित्रपट निर्मात्याने आतापर्यंत 8 ते 10 लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी अजय यादवला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

साईनाथ स्पिरीट कंपनीला 200 कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य पाहिजे होते. ही माहिती अजय यादवला मिळाली होती. ही कंपनी आपल्याकडे आर्थिक सहाय्याकरता येईल, असा सापळा अजय यादवने रचला आणि अगदी कमी व्याजदरात आणि कमी वेळात आपण तुम्हाला 200 कोटी रुपये आर्थिक पुरवठा देतो, याकरता 15 लाख रुपये द्या, असं सांगितलं.

बॉलिवूडचा 70 वर्षीय अभिनेता घेतोय घटस्फोट, पत्नीनं मागितली 10 कोटींची पोटगी

यादव हा 2011 पासून बाॅलिवूडमध्ये सक्रिय आहे. या दरम्यान त्याने अनेक बड्या निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते, अभिनेत्री आणि फायनान्सरशी जवळीक बनवली होती. यांपैकी अनेकांना अजय यादवने गंडा घातल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे अजय याद ने कोणाला फसवले असेल तर त्यांनी पोलिसांशी संपर्क करावा, असं आवाहन मुंबई पोलिसांनी केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 22, 2020 07:56 AM IST

ताज्या बातम्या