मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

"कोरोनाने आपली विकेट घेऊ नये असे वाटत असेल तर..." Mumbai पोलिसांचं ट्विट होतंय तुफान व्हायरल

"कोरोनाने आपली विकेट घेऊ नये असे वाटत असेल तर..." Mumbai पोलिसांचं ट्विट होतंय तुफान व्हायरल

"कोरोनाने आपली विकेट घेऊ नये असे वाटत असेल तर..." Mumbai पोलिसांचं ट्विट होतंय तुफान व्हायरल

"कोरोनाने आपली विकेट घेऊ नये असे वाटत असेल तर..." Mumbai पोलिसांचं ट्विट होतंय तुफान व्हायरल

मुंबईसह महाराष्ट्रात आणि देशात कोरोनाचा खूपच वेगाने संसर्ग होताना दिसत आहे. त्यासोबतच कोरोनाच्या ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येतही वेगाने वाढ होताना दिसत आहे. यामुळे नागरिकांनी काळजी घेणं आवश्यक आहे.

  • Published by:  Sunil Desale

मुंबई, 11 जानेवारी : मुंबईसह महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ (Coronavirus cases increasing in Mumbai Maharashtra)  होताना दिसत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य सरकारकडून (Maharashtra Government) काही निर्बंध सुद्धा लावण्यात आली आहेत. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रसासनाकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान मुंबई पोलिसांनी (Mumbai Police tweet) केलेल्या एका ट्विटची सध्या जोरदार चर्चा होत असून हे ट्विट सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.

मुंबई पोलीस सोशल मीडियात नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन नागरिकांना सतर्क करणारे, आवाहन करणारे किंवा सल्ला देणारे मीम्स पोस्ट करण्यात येत असतात. आता सुद्धा मुंबई पोलिसांकडून एक ट्विट करण्यात आलं असून त्याद्वारे नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांनी नागिरकांना केली आहे.

मुंबई पोलिसांनी टेस्ट क्रिकेटमधील थिमचा वापर करत एक फोटो पेस्ट केला आहे. ज्यामध्ये बॅटिंग करत असलेला व्यक्ती हा तुम्ही असल्याचं म्हटलं आहे. तर शेजारी असलेले फिल्डर्स हे ओमायक्रॉन, डेल्टाक्रॉन तर बॉलर कोरोना असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हा फोटो पोस्ट करताना आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं, "कोरोनाने आपली 'विकेट' घेऊ नये असे वाटत असेल तर मास्क नामक 'हेल्मेटच' ठरू शकेल आपली सर्वोत्तम रणनीती. मास्क वापरा, लसीकरण करा आणि कोरोनाचे नियम पाळा."

राज्यात कठोर निर्बंध; संपूर्ण नियमावली

राज्य सरकारने (Maharashtra Government) कठोर निर्बंध लागू (Restrictions imposed in Maharashtra) केले आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हॉटेल, मॉल आणि थिएटर रात्री 10 वाजेपर्यंतच सुरू राहणार आहे. हे निर्बंध आणि नियम 10 जानेवारी 2022 च्या मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

नागरीकांचे बाहेर फिरणे

1. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला बाहेर फिरण्यासाठी पहाटे 5 ते रात्री 11 पर्यंत बंदी.

2. पाच किंवा त्याहून जास्त लोकांच्या समूहाला अत्यावश्यक कारणाशिवाय बाहेर फिरण्यासाठी रात्री 11 पर्यंत ते पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी.

शासकीय कार्यालये

1. महत्त्वाच्या कामासाठी कार्यालय प्रमुखाच्या लेखी परवानगीविना आगंतुकांवर बंदी.

2. कार्यालय प्रमुखांनी नागरीकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधेची व्यवस्था करावी.

3. बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीची व्यवस्था

4. कार्यालय प्रमुखांच्या गरजेनुसार वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कार्यालयीन वेळेत कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे तसेच गरजेनुसार कार्यालयीन कामकाजाच्या वेळांमध्ये बदल करणे. याकरिता कर्मचाऱ्यांसाठी कामाच्या वेळांमध्ये बदलाचाही विचार करू शकतील.

5. कार्यालय प्रमुखांनी कोविडरोधी वागणुकीचे काटेकोर पालन केले जाईल, याची काळजी घ्यावी.

6. कार्यालय प्रमुखांनी थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

ओमायक्रॉन व्हेरिएंट करणार कोरोना महामारीचा शेवट? एक्सपर्ट्सने दिलं दिलासादायक उत्तर

खासगी कार्यालये

1. कार्यालय व्यवस्थापनाने वर्क फ्रॉम होमला प्रोत्साहन देत कामकाजाच्या वेळा कमी कराव्यात. कार्यालयात पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचारी उपस्थित राहणार नाहीत, याचीही दक्षता घ्यावी तसेच कर्मचाऱ्यांसाठी वेळांमध्ये बदल करण्याचाही विचार करतील. तसेच कार्यालये 24 तास सुरू ठेवून टप्प्याटप्प्याने काम करण्याबाबतही विचार करावा. कार्यालयीन कामकाजाच्या वेळा असामान्य असतील आणि त्यासाठी प्रवास करणे अत्यावश्यक असेल तर अत्यावश्यक कामासाठी ओळखपत्र दाखवून परवानगी मिळवता येऊ शकेल. अशाप्रकारचा निर्णय घेताना महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षितता आणि सोयीचा विचार करणे बंधनकारक राहील.

2. लसीकरण पूर्ण केलेले कर्मचारीच कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील. लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचाऱ्यांना लसीकरण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन द्यायलाच हवे.

3. कार्यालय व्यवस्थापनाने सर्व कर्मचारी सर्वकाळ कोविडरोधी वागणुकीचे तंतोतंत पालन करतील याची दक्षता घ्यावी.

4. कार्यालय व्यवस्थापनाने थर्मल स्कॅनर्स, हँड सॅनिटायझर्स उपलब्ध करून द्यावेत.

लग्नसमारंभ - कमाल 50 व्यक्ती

अंत्यविधी - कमाल 20 व्यक्ती

सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रम - कमाल 50 व्यक्ती

शाळा आणि कॉलेज / कोचिंग क्लासेस (खाली दिलेल्या बाबी वगळता 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील)

1. विविध शैक्षणिक बोर्डांकडून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवायचे उपक्रम.

2. प्रशासकीय कामकाज आणि शिक्षकांनी अध्यापनाव्यतिरिक्त करायचे कामकाज.

3. शालेय शिक्षण विभाग, कौशल्य आणि उद्योजकता विकास विभाग, तांत्रिक आणि उच्च शिक्षण विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, महिला व बालविकास विभाग आणि अन्य वैधानिक प्राधिकरणांकडून राबविण्यात येणारे किंवा परवानगी दिलेले उपक्रम.

4. या निर्बंधांना अपवादाच्या स्थितीत हे विभाग आणि प्राधिकरणांना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून परवानगी घ्यावी लागेल.

First published:

Tags: Corona, Mumbai, Mumbai police