मुंबई, 28 मे: मागील काही दिवसांपासून मुंबईत फुटपाथवरून आणि रिक्षातून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या हातातील मोबाइल फोन, पर्स तसेच गळ्यातील दागिने किंवा महागड्या वस्तू खेचून पोबारा करणाऱ्या टोळीने (chain snatchers) दहशत माजवली होती. वेषांतर करून नागरिकांना लुटणाऱ्या या चोरट्यांना जेरबंद (Arrest) करण्यात अखेर मुंबई पोलिसांना यश आलं आहे. संबंधित चोरट्यांनी मुंबई पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाठलाग (Mumbai police chased in filmy style) करून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या नावावर विविध गुन्ह्यांच्या नोंदी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
संबंधित अटक केलेल्या आरोपींची नावं आरीफ खाटीक (वय-19), राघव चव्हाण (वय- 19) आणि अब्दुल खान (वय -21) वर्षीय अशी आहेत. या तिघांवर बोरिवली, कांदिवली, समतानगर, गोरेगाव, मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई अशा विविध ठिकाणी अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. ही टोळी मुंबईत अनेक ठिकाणी सक्रीय होती. यांनी अनेकदा पोलिसांना गुंगारा दिला होता. त्यांची चोरी करण्याची पद्धत अन्य चोरट्यांहून वेगळी होती. चोरी केल्यानंतर टोळीतील सदस्यचं चोरी झालेल्या ठिकाणी विविध वेशात यायचे. त्यामुळे चोर नक्की होते आणि कोणत्या दिशेने गेले? याबाबत काहीही थांगपत्ता लागत नसे.
त्यामुळे प्रत्यक्षदर्शींची देखील दिशाभूल व्हायची. ही टोळी सर्वांनाच बुचकळ्यात टाकायची. गेल्या अनेक दिवसांपासून या टोळीनं अशाच पद्धतीनं चोऱ्या करत मुंबईकरांची आणि पोलिसांची झोप उडवली होती. पण शेवटी हे सराईत गुन्हेगार पोलिसांच्या कचाट्यात सापडले आहेत. आरे पोलीस ठाण्यातील पोलिसांनी या टोळीचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या आहेत. आरे पोलीस गोरेगाव पूर्व येथील विरवानी बेस्ट बस स्टँडच्या परिसरात गस्त घालत होते.
हे ही वाचा-एकतर्फी प्रेमातून त्रास; जाब विचारायला गेलेल्या तरुणीच्या नातेवाईकांवर गोळीबार
यावेळी दोन तरुण मोटरसायकलीवरून संशयास्पद फिरताना दिसले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना हटकले असता चोरट्यांनी मोटर सायकलवरून धूम ठोकली. याचवेळी पोलिसांनी देखील संबंधित आरोपींचा पाठलाग सुरू केला. बराच गुंगारा दिल्यानंतर अखेर मुंबई पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या. यानंतर केलेल्या चौकशीत ही टोळी मोबाईल आणि दुचाकी गाड्या चोरी करत असल्याचं निष्पन्न झालं आहे. शिवाय ही टोळी या अगोदर अॅक्टिव्हा गाडी चोरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. यावेळी पोलिसांनी आरोपींकडून 5 मोटरसायकली आणि 100 हून अधिक मोबाईल फोन जप्त केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Mumbai, Theft