Home /News /mumbai /

घरात निघाला भलामोठा अजगर, मुंबई पोलिसाने जीवाची बाजी लावत थेट हाताने पकडलं, VIDEO VIRAL

घरात निघाला भलामोठा अजगर, मुंबई पोलिसाने जीवाची बाजी लावत थेट हाताने पकडलं, VIDEO VIRAL

पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या धाडसामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

मुंबई, 1 जानेवारी : मुंबईत एकीकडे थर्टी फस्टचं सेलिब्रेशन सुरू असताना धारावीत गुरुवारी रात्री अचानक एका घरात अजगर शिरल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काही काळासाठी भीतीचंही वातावरण झालं. मात्र पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या धाडसामुळे सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. या अजगराला मुंबई पोलीस दलातील मुरलीधर जाधव या धाडसी हवालदारानं घरातून बाहेर काढलं आणि भयभीत झालेल्या नागरिकांची सुटका केली. अजगर घरात शिरल्यानं काल धारावीत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अजगराला पकडताच लोकांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला आणि पोलिसांचं अभिनंदन केलं. पोलिसांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत हवालदार मुरलीधर जाधव यांना काही तरुणांनी उचलून जल्लोषही केला. धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे एका व्यक्तीच्या घरात पहिल्या माळ्यावर सहा फूट लांबीचा अजगर सुरक्षित शिताफीने पकडण्यात आला आहे. मुरलीधर जाधव यांनी केलेल्या या कामगिरीमुळे त्यांचे पोलीस दलात कौतुक होत आहे.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या