मुंबई पोलिसांनी दोनवेळा चौकशीला बोलावले, आता रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव!

मुंबई पोलिसांनी दोनवेळा चौकशीला बोलावले, आता रश्मी शुक्लांची हायकोर्टात धाव!

कोरोनाचे कारण देऊन रश्मी शुक्ला यांनी चौकशीसाठी येण्यास नकार दिला. त्यामुळे दुसऱ्यांदा समन्स बजावला आता...

  • Share this:

मुंबई, 03 मे :  महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी (phone tapping case) आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना पोलिसांनी समन्स बजावून चौकशीला बोलावलं आहे. पण, रश्मी शुक्ला यांनी आता हैद्रराबाद हायकोर्टात धाव घेतली आहे. चौकशीला स्थगिती देण्यास मागणी केली आहे.

राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांना मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. पण, कोरोनाचे कारण देऊन शुक्ला यांनी येण्यास नकार दिला. त्यानंतर पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले होते. आपल्याला चौकशीसाठी बोलावण्यात येत असल्यामुळे चौकशी अधिकारी आपला छळ करत आहे, असा आरोप रश्मी शुक्ला यांनी केला आहे.  रश्मी शुक्ला यांनी हैद्राबाद हायकोर्टात 29 एप्रिल रोजी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी होणार आहे, असं वृत्त टीव्ही 9 मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे.

प्राण यांची अरूणा इरानी यांना वाटत होती भीती; बलात्काराच्या भीतीनं कोसळलं रडू

विशेष म्हणजे, रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने चौकशीसाठी बोलावले होते. पण, त्या चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ करत होत्या. रश्मी शुक्ला सध्या हैदराबाद येथील निवासस्थानी आहे. त्यामुळे कोरोनाच्या परिस्थितीमुळे येणे शक्य नसल्याचे सांगितले आहे. तुम्ही प्रश्नावली ईमेलद्वारे पाठवावी, त्याला उत्तर देते, असं शुक्ला यांनी समन्सला उत्तर दिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा याबद्दल समन्स बजावण्यात आले होते.

 रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप

भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करत पोलीस दलात बदल्या करण्यासाठी अनेक फोन कॉल केले गेले होते, असा आरोप केला होता. तसंच त्यांनी एक अहवाल सुद्धा वाचून दाखवला होता. एवढंच नाहीतर याचा पुरावा केंद्रीय गृहसचिवांकडे देण्यात आला होता. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारने या प्रकरणाची चौकशी केली असता रश्मी शुक्ला यांच्याकडून माहिती लीक झाल्याचे निदर्शनास आले. एवढंच नाहीतर रश्मी शुक्ला यांनी दहशतवादी प्रकरणासाठी फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. पण, त्यांची याचा गैरवापर केला.

साताऱ्यात अवकाळी पावसाचा कहर, वीज कोसळून 3 जणांचा मृत्यू

शुक्ला यांनी रितरस फोन टॅप करण्यासाठी परवानगी घेतली होती. दहशतवादी प्रकरणामध्ये पुरावे शोधून काढण्यासाठी त्यांनी ही परवानगी घेतली होती. पण हे करत असताना रश्मी शुक्ला यांनी महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्र्यांचे फोन सुद्धा टॅप केले आहे, असा आरोप काही मंत्र्यांनी केला. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी याबद्दल गंभीर आरोप सुद्धा केले. रश्मी शुक्ला या भाजपासाठी काम करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासकट आरोप केले होते. त्यानंतर आता शुक्ला यांना चौकशीला सामोरं जावं लागत आहे.

Published by: sachin Salve
First published: May 3, 2021, 10:28 AM IST
Tags:

ताज्या बातम्या