IAS-IPS च्या सोसायटीत राजरोसपणे सुरू होते सेक्स रॅकेट... असा झाला भंडाफोड

IAS-IPS च्या सोसायटीत राजरोसपणे सुरू होते सेक्स रॅकेट... असा झाला भंडाफोड

मुंबई पोलिसांनी बुधवारी ओशिवारा परिसरातील हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या पाटलीपुत्र सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला.

  • Share this:

मुंबई, 12 सप्टेंबर: मुंबई पोलिसांनी बुधवारी ओशिवारा परिसरातील हायप्रोफाइल समजल्या जाणाऱ्या पाटलीपुत्र सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये राजरोसपणे सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या सोसायटीत बहुतांश फ्लॅट आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि उच्च पदस्ठ अधिकाऱ्यांचे आहेत. पोलिसांनी या कारवाईत दोन तरुणींची सुटका केली असून एका दलाल महिलेला अटक केली आहे.

ओशिवारा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गोपनिय माहितीच्या आधारे सामाजिक शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री ओशिवारा परिसरातील गॅलक्सी बिल्डिंगमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. फ्लॅटमध्ये दोन तरुणी आक्षेपार्ह अवस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी त्याची सुटका केली. तरुणींकडून जबरदस्तीने देहविक्री करून घेणारी दलाल शबाना शेख (45) हिला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे. सुटका करण्यात आलेल्या दोन्ही तरूणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, जून 2014 मध्येही ओशिवारा पोलिसांच्या सामाजिक शाखेच्या पथकाने पाटलीपुत्र सोसायटीत अशाच प्रकारे छापा टाकून सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला होता.

मुंबईत नरबळी.. त्याने मित्राच्याच जुळ्या मुलांची हत्या करण्याचा असा घेतला निर्णय

मुंबईतला उच्चभ्र समजल्या जाणाऱ्या कुलाबा परिसरात तीन वर्षांच्या चिमुरडीचा नरबळी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (7 सप्टेंबर) कुलाब्यातील इमारतीच्या सातव्या मजल्यावरून पडून शनाया हाथीरामाणी या चिमुरडीचा मृत्यू झाला होता. परंतु हा अपघात नसून घातपात होता, असे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. नरबळीच्या उद्देशाने शनायाची हत्या झाल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणी मारेकरी अनिल जुगाणी याला पोलिसांनी अटक केली आहे.

काय आहे प्रकरण?

आरोपी अनिल जुगाणी हा काही वर्षे मोरक्कोत वास्तव्य करत होता. तो सहा महिन्यापूर्वीच मुंबईत परतला. मोरक्कोत एका महिलेने त्याच्यावर जादुटोणा केला होता. यातून बाहेर यायचे असेल तर दोन जुळ्या मुलांचा नरबळी द्यावा लागेल, असा तोटका करण्यास अनिलला सांगण्यात आले होते. अनिल मुंबईत आल्यानंतर सातत्याने त्याच्या डायरीत दोन जुळ्यांची हत्या कर, जेलमध्ये जा आणि स्वतःला वाचव,असे लिहीत होता, अशी धक्कादायक माहिती पोलिसांना चौकशीतून मिळाली आहे.

मित्राच्याच जुळ्या मुलींची हत्या करण्याचा घेतला निर्णय...

अनिल जुगाणी याने त्याच्या मित्राच्याच जुळ्या मुलांची हत्या करण्याचा निर्णय घेतला. अनिलने शनिवारी शनाया आणि तिच्या जुळ्या भावाला आपल्या घरी आणले. शनायाला इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली फेकले. मात्र, तितक्यात शनायाची आया आल्याने तिचा भाऊ थोडक्यात बचावला.

VIDEO: वाहतूक कोंडीत शिरले दोन बैल आणि पुढे काय झालं तुम्हीच पाहा

Published by: Sandip Parolekar
First published: September 12, 2019, 2:18 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading