मुंबई पोलिसांची मोठी कारवाई,TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिकटीव्हीच्या CEOला अटक

मुंबई पोलिसांची मोठी कारवाई,TRP घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिकटीव्हीच्या CEOला अटक

विकास खानचंदानी यांची या आधीही चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी आज विकासला मुंबई पोलिसांनी अटक केली.

  • Share this:

मुंबई, 13 डिसेंबर :  मुंबईत टीआरपी घोटाळ्या प्रकरणी (TRP scam) मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. रिपब्लिक टीव्ही (Republic TV) या वृत्तवाहिनीचे सीईओ विकास खानचंदानी याला अटक करण्यात आली आहे.

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या प्रकरणी आतापर्यत 13 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानीला बेड्या ठोकण्यात आल्या आहे. विशेष म्हणजे, विकास खानचंदानी यांची या आधीही चौकशी सुद्धा करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणी आज विकासला मुंबई पोलिसांनी अटक केली.

काही दिवसांपूर्वीच अर्णब गोस्वामी यांनी रिपब्लिक टीव्हीवर दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेतून केली होती. त्याचबरोबर या प्रकरणी सीबीआयकडून चौकशी करावी, अशीही मागणीही गोस्वामी यांनी केली होती. त्यावर 7 डिसेंबर रोजी या याचिकेवर न्यायमूर्ती जस्टीस चंद्रचुड यांच्यासमोर सुनावणी झाली.

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास हा सीबीआयकडे देण्याबद्दल स्पष्ट नकार दिला आहे. ही याचिकाही  फेटाळून लावण्यात आली आहे. तसंच रिपब्लिक टीव्हीवरील गुन्हे रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

गोस्वामी यांनी या याचिकेमध्ये सर्व एफआयआर रद्द करावे आणि महाराष्ट्र पोलिसांकडून संपादक आणि इतर कर्मचाऱ्यांना अटक होऊ नये, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर या प्रकरणाचा तपास हा मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्यात यावा अशी मागणी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयाने ही मागणी अनैसर्गिक असल्याचे सांगून सुनावणी करण्यास नकार दिला.

Published by: sachin Salve
First published: December 13, 2020, 11:33 AM IST
Tags:

ताज्या बातम्या