मुंबई, 11 डिसेंबर : मुंबईमध्ये ड्रग्सचा बाजार करणाऱ्या चौघांना 1 कोटी 40 लाख रुपयांच्या ड्रग्ससह करण्यात आली आहे. दीनानाथ उर्फ टुनटून रंगनाथ चौहान वय 33, फ्लूग्नस उर्फ रोलन्स उर्फ मुस्तफा लाऊड आका वय 31, जेरमेन जेरी वय 29, सन्नी साहू वय 34 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून फ्लूग्सन आणि जेरमेन जेरी हे आईव्हरी कोस्ट देशाचे नागरिक आहेत.
सन्नी साहू हा या टोळीचा प्रमुख होता. गुन्हे शाखा 11 चे प्रधान पोलीस निरीक्षक सुनील माने यांना माहिती मिळाली की मेफेड्रॉन (एम डी) हे अमली पदार्थ विकण्यासाठी 2 परदेशी नागरिक खजुरीया नगर कांदिवली येथे येणार आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आलं.
मिळालेल्या माहितीची शहानिशा करून क्राइम ब्रांचचं पथक कांदिवली येथील खजुरिया नगर येथे सज्ज झालं. ऑटोरिक्षामधून दोन इसम आले व काही वेळाने ऍक्टिवा मोटर सायकलवरून दोन परदेशी नागरिक आले. परदेशी नागरिक रिक्षामध्ये असलेल्या दोन इसमांना पॅकेट देताना क्राइम ब्रांच नजरेत आले. क्राईम ब्रँचला त्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यानंतर क्राईम ब्रांचच्या पथकाने त्या इसमांच्या चारही बाजूने घेराव घालून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून क्राईम ब्रांचला 700 ग्राम एमडी मिळून आलं ज्याची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही परदेशी नागरिक ड्रग्सचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले होते आणि स्थानिक माहिती गोळा केली होती. या सर्वांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही टोळी ड्रग्स कुठे विकायची आणि कुठून आणायची आता याचा तपास क्राइम ब्रांचकडून केला जात आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभारी पोलीस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झीने, विशाल पाटील, नितीन उत्तेकर, पोलीस उप निरीक्षक सुधीर कोरगावकर, तानाजी पाटील पोलीस अमलदार रवींद्र भांबीड, नितीन शिंदे,दिलीप वाघरे,संतोष माने,सुबोध सावंत, सत्यनारायण नाईक, विनायक साळुंखे, राजेश चव्हाण,महादेव नावगे, राकेश लोटणकर, सचिन कदम, जयेश केनी, अजित चव्हाण, अजय कदम, सचिन आवळे, निलेश शिंदे, महेश रावराणे, सारिका कदम, रिया अनेराव चालक उपेंद्र मोरे,प्रशांत ढगे या पथकाद्वारे करण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.