मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

बार्ज P305 बुडाल्याप्रकरणात पोलिसांची पहिली कारवाई, PAPPAA शिपिंग कंपनीच्या तिघांना अटक

बार्ज P305 बुडाल्याप्रकरणात पोलिसांची पहिली कारवाई, PAPPAA शिपिंग कंपनीच्या तिघांना अटक

Barge P305 Updates: मे महिन्यात आलेल्या तौत्के चक्रीवादळामध्ये (Cyclone Tauktae) समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P-305 बार्ज (P-305 Barge) बुडालं होतं.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 03 जुलै: मे महिन्यात आलेल्या तौत्के चक्रीवादळामध्ये (Cyclone Tauktae) समुद्र किनाऱ्यापासून 175 किमी अंतरावर P-305 बार्ज (P-305 Barge) बुडालं होतं. यात 86 लोकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली आहे. यलो गेट पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.

अटक करण्यात आलेले सर्व आरोपी PAPPAA Shipping मधील कर्मचारी आहेत. पापा शिपिंग कंपनीचे मॅनेजर प्रसाद गणपत राणे, पापा शिपिंग कंपनीचे डायरेक्टर नितीन दिनानाथ सिंग आणि टेक्निकल सुप्रीडेंट अखिलेश तिवारी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या सर्वांवर भा.द. वी 304 (2),338,34 कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हेही वाचा- अखेर ताब्यात, गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा सापडला

नेमकं काय घडलं होतं?

या चक्रीवादळात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यापासून (Mumbai coast) खोल समुद्रात 175 किलोमीटर अंतरावर चार बार्ज भरकटले. चक्रीवादळात बार्जचे नांगर तुटल्याने ते भरकटले. या चारही बार्ज (barge)वर खलाशी आणि कर्मचारी मिळून असे एकूण 707 उपस्थित होते. या सर्वांच्या बचावासाठी नौदल (Indian Navy) आणि तटरक्षक दलाने बचावकार्य राबवलं.

P-305 या बार्जवर उपस्थित असलेल्या 261 कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात होता. चक्रीवादळाच्या धोक्याच्या संदर्भात आधीच सूचना देऊनही इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं गेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत 86 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा-  मुंबईजवळच्या 'या' जिल्ह्यातही बोगस लसीकरण, बनावट प्रमाणपत्राचंही वाटप

P-305 या बार्जवर एकूण 261 कर्मचारी होते. यापैकी 188 कर्मचाऱ्यांना नौदलाने वाचवले आहे. आयएनएस कोच्ची या युद्दनौकेच्या सहाय्याने या कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले. ताशी 100 किमी वाऱ्याचा वेग असतानाही नौदलाने युद्धपातळीवर कार्य करुन या सर्वांचा जीव वाचवला.

First published:

Tags: Mumbai