मुंबई, 17 डिसेंबर : महिलांसोबत अश्लील वर्तन आणि गैरवर्तन होण्याचे प्रकार थांबायचं नाव घेत नसतानाच मुंबईच्या दिंडोशी पोलिसांना मात्र एक सिरियल मोलेस्टरला पकडण्यात यश आलं आहे. या आरोपीने 50 हून अधिक महिलांसोबत अश्लील वर्तन केल्याची धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. त्यानं 9 वर्षांत 50 हून अधिक महिलांसोबत गैरवर्तन आणि अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी 30 वर्षीय आरोपीच्या मुस्क्या आवळल्या आहेत.
2011मध्ये एका महिलेसोबत अश्लील वर्तन केल्या प्रकरणी हा 30 वर्षीय आरोपी तुरुंगात गेला होता. जामीन घेऊन तो बाहेर आला मात्र त्याचे कारनामे काही थांबण्याचं नाव घेत नव्हते. महिलेची छेड काढणं, महिलांसोबत अश्लील वर्तन करण्याचे प्रकार या आरोपीचे सुरूच होते.
दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये या आरोपीने एका 24 वर्षीय महिलेसोबत गैरवर्तन केलं आहे. आरोपीने या महिलेला मिठी मारली आणि त्यानंतर अश्लील वर्तन करून तिथून फरार झाला. या प्रकरणी महिलेनं दिंडोशी पोलीस ठाण्यात फिर्याद देत न्यायाची मागणी केली.
रस्त्यानं जाताना करायचा अश्लील वर्तन, 50 हून अधिक महिलांची छेड काढणाऱ्या आरोपीला बेड्या pic.twitter.com/GlNIEHJw5H
— Kranti Kanetkar (@Krantikanetkar2) December 17, 2020
पीएसआय गणेश फड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी एक मोहीम आखली. सगळे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर माहितीच्या आधारे तपास सुरू केला. या दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आली 2017 मध्ये पवई इथे एका महिलेसोबत अश्लील वर्तन करणारा आरोपी आणि दिंडोशीतील घटनेचा आरोपी एकच आहे हे समोर आलं आणि महत्त्वाची कडी सापडली. पोलिसांनी दोन्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आणि आरोपीच्या मुस्क्या आवळत त्याला न्यायालयात हजर केलं. न्यायालयाकडून आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.