मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईत Bunty-Babali चा इन्शुरन्स कंपनीला गंडा, नोकरीच्याच ठिकाणी लंपास केले 8 कोटी

मुंबईत Bunty-Babali चा इन्शुरन्स कंपनीला गंडा, नोकरीच्याच ठिकाणी लंपास केले 8 कोटी

युनायडेट इंडिया इन्शुरन्स कंपनीत अफरातफर करून 8 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या पती-पत्नीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

युनायडेट इंडिया इन्शुरन्स कंपनीत अफरातफर करून 8 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या पती-पत्नीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

युनायडेट इंडिया इन्शुरन्स कंपनीत अफरातफर करून 8 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या पती-पत्नीला मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

    मुंबई, 1 जुलै: युनायडेट इंडिया इन्शुरन्स कंपनीत (United India Insurance) अफरातफर करून 8 कोटी 90 लाख रुपयांचा अपहार करणाऱ्या पती-पत्नीला (Husband and wife) मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं (Economic offense wing) अटक (Arrest) केली आहे. या कंपनीत हा पती आणि पत्नी दोघंही असिस्टंट मॅनेजर (Assistant manager) पदावर कार्यरत होते. संस्थेतील अन्य काहीजणांना हाताशी धरून या दोघांनी वेगवेगळ्या 7 बँक खात्यांमध्ये 8 कोटी 90 लाख (8.9 crore) रुपये ट्रान्सफर करून घेतल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मुख्य आरोपी असणारा कुशल सिंग हा कंपनीच्या चर्चगेट कार्यालयात काम करत होता. त्याच्याकडे कंपनीच्या कॉर्पोरेट सेल अकाऊंटची जबाबदारी होती. त्याच्या पत्नीनं संस्थेशी संबंधित काहीजणांसोबत एक योजना आखून वेगवेगळी 7 बँक खाती काढली आणि त्यात कोट्यवधींची रक्कम जमा केली. कंपनीचे उपव्यवस्थापक जयदीप सिन्हा यांच्या तक्रारीनंतर या दोघांना पोलिसांनी अटक केली. असे लाटले पैसे 21 मे रोजी कंपनीच्या चेन्नईतील मुख्य कार्यालयात मुंबईतून एक निरोप देण्यात आला. मुंबईतील कंपनीच्या एका खात्यातून संशयास्पद व्यवहार करण्यात आले असून कोट्यवधी रुपये गायब असल्याचं सांगण्यात आलं. याबाबत कंपनीनं अंतर्गत चौकशी केली असता धक्कादायक बाबी उघड झाल्या. असिस्टंट मॅनेजर कुशल सिंह आणि त्याच्या पत्नीनं वेगवेगळ्या 7 खात्यांमध्ये मिळून 8 कोटी 9 लाख 98 हजार 795 रुपये ट्रान्सफर केल्याचं सिद्ध झालं. मुंबई आणि जयपूरमधील वेगवेगळ्या बँकांमध्ये ही खाती उघडण्यात आली होती. 13 नोव्हेंबर 2020 ते 23 एप्रिल 2021 या काळात हे व्यवहार करण्यात आले होते. हे वाचा - LinkedIn वर अकाउंट असेल तर तुमची वैयक्तिक माहिती धोक्यात! लाखोंचा डेटा लीक आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू कंपनीतील एकाही अधिकाऱ्याला संशय येऊ न देता हे व्यवहार दोघांनी कसे पार पाडले, याबाबत पोलिसांनाही आश्चर्य वाटत आहे. कंपनीतील आणखी काही कर्मचाऱ्यांचा यात सहभाग होता का, याचाही पोलीस शोध घेत आहेत. मात्र आतापर्यंत तरी तसा कुठलाही पुरावा पोलिसांना मिळालेला नाही. लवकरच या प्रकरणातील धागेदोरे शोधून काढून अधिक तपशील जाहीर करू, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Financial fraud, Mumbai

    पुढील बातम्या