ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्याच्या मुलाला अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

मुंबई पोलिसांकडून ड्रग्ज प्रकरणात एक मोठी कारवाई करण्यात आली असून एका अभिनेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे.

  • Share this:

मुंबई, 5 मे: ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) एक मोठी कारवाई केली आहे. ड्रग्ज (Drugs) प्रकरणात बॉलिवूड (Bollywood) कनेक्शन समोर आल्यानंतर अनेक कलाकारांची चौकशी एनसीबीने केली त्यानंतर काही कलाकारांना अटकही करण्यात आली होती. याच ड्रग्ज प्रकरणात आता मुंबई पोलिसांनी एका अभिनेत्याच्या मुलाला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव ध्रुव असे आहे.

अभिनेता दिलीप ताहील (Actor Dilip Tahil) यांचा मुलगा ध्रुव ताहील (Dhruv Tahil) याला ड्रग्ज प्रकरणात अटक केली आहे. मुंबई पोलिसांच्या अँन्टी नारकोटिक्स सेल (Anti Narcotic Cell) अर्थात अंमली पदार्थ विरोधी शाखेने ही कारवाई केली आहे. ध्रुव ताहील हा एका ड्रग्ज पेडलरच्या संपर्कात होता आणि त्या ड्रग्ज पेडलरकडून ध्रुव वारंवार ड्रग्जची मागणी करत होता इतकेच नाही तर ड्रग्जसाठी त्याने पैसेही दिल्याचे उघड झाले आहे.

ध्रुव ताहील आणि ड्रग्ज पेडलर यांच्यात झालेल्या मेसेजेसची माहिती समोर आल्यावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ड्रग्ज पेडलर मुजमिल अब्दुल रहमान शेख याला अटक केली होती. आरोपीकडून पोलिसांनी 35 ग्रॅम एमडी ड्रग्ज सुद्धा जप्त केले होते.

अशी केली पोलिसांनी कारवाई

आरोपी मुजमिल याचा मोबाइल तपासला असता त्याचे ध्रुव ताहील याच्यासोबत मेसेजेस झाल्याचे समोर आले. मेसेजनुसार ध्रुव हा वारंवार ड्रग्जची मागणी करत होता आणि त्यासाठी आरोपी मुजमिल याला ध्रुवने ऑनलाईन पैसेही ट्रान्सफर केले असल्याची माहिती तपासात समोर आली त्यानंतर मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून ध्रुव ताहील याला अटक करण्यात आली आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 5, 2021, 8:13 PM IST

ताज्या बातम्या