दहशतवादी कारवाईच्या शक्यतेने मुंबई पोलीस अलर्ट!

दहशतवादी कारवाईच्या शक्यतेने मुंबई पोलीस अलर्ट!

शालीमार एक्स्प्रेसमध्ये सापडलेली स्फोटके आणि नवी मुंबईतील उरणमध्ये ISISशी संबंधित संदेश लिहल्यामुळे मुंबई पोलीस दल अलर्ट झाले आहे.

  • Share this:

मुंबई, 06 जून:  मुंबईतील कुर्ला टर्मिनवर शालीमार एक्स्प्रेसमध्ये सापडलेली स्फोटके आणि नवी मुंबईतील उरणमध्ये ISISशी संबंधित संदेश लिहल्यामुळे मुंबई पोलीस दल अलर्ट झाले आहे. तर रेल्वे पोलीस दलाने देखील बंदोबस्त वाढवला आहे. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानक आणि पोलीस ठाण्यांना अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मुंबई पोलीस दलाने सर्व ठाण्यांना अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. दहशतवादी घटना घडू नयेत म्हणून मुंबईतील सीएसटीएम स्थानकावर तपासणी पथक वाढवण्यात आले आहे. दरम्यान शहरातील सर्वच रेल्वे स्थानकांवर तपासणी वाढवण्यात आली आहे. तसेच सर्व कर्मचाऱ्यांना अलर्ट राहण्यास सांगितले आहे. प्रवाशांच्या बॅग चेक केल्या जात आहेत तसेच गरज वाटली तर चौकशी देखील केली जात आहे. सीएसटीएम हे मुंबईतील सर्वात वर्दळीचे एक स्थानक असल्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे.

कुर्ला आणि नवी मुंबईतील घटनेमुळे मुंबईतील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असली आहे. पण दहशतवादी कारवाईची शक्यता लक्षात घेता काही दिवसांपूर्वीच पालघर पोलिसांकडून किनारपट्टीवरील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती. समुद्रामार्गे दहशतवादी मुंबईत प्रवेश करण्याची शक्यता असल्याचा समजल्यानंतर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली होती.

बुधवारी शालीमार एक्स्प्रेसमध्ये स्फोटके सापल्यामुळे खळबळ उडाली होती. कुर्ला टर्मिनसमध्ये शालीमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिन सापडली होती. यासंदर्भातील वृत्त कळताच रेल्वे पोलीस आणि एटीएसने तातडीने कारवाई करत संबंधित स्फोटके जप्त केली होती.

'जय भवानी, जय शिवाजी' च्या जयघोषानं रायगड दुमदुमला

First published: June 6, 2019, 1:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading