अखेर ठरलं...घुसखोरांविरुद्ध मनसेचा मोर्चा निघणार, हा आहे मार्ग

अखेर ठरलं...घुसखोरांविरुद्ध मनसेचा मोर्चा निघणार, हा आहे मार्ग

सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतू... पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. त्यांना आपल्या देशातून हाकललेच पाहिजे.

  • Share this:

मुंबई 03 फेब्रुवारी : पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मनसेच्या मोर्चाचा मार्ग अखेर ठरलाय. गेल्या काही दिवसांपासून मोर्चाला परवानगी देण्यावरून घोळ सुरु होता. मनसेने परवानगीसाठी जो मार्ग पोलिसांना दिला होता. त्या मार्गाला पोलिसांनी परवानगी नाकारलीय. मात्र दुसरा मार्ग ठरवून दिलाय. आता त्या मार्गाने हा मोर्चा जाणार आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या मुंबईत झालेल्या महामेळाव्यात राज ठाकरे यांनी या मोर्चाची घोषणा केली होती.

राज ठाकरे यांनी नवं धोरण स्वीकारल्याची घोषणा केल्यानंतरचं मनसेचं हे पहिलच आंदोलन आहे. हिंदुत्वाची भूमिका घेत राज ठाकरे यांनी मुंबईत आलेल्या घुसखोरांविरुद्ध हल्लाबोल केला होता. या मोर्चाच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेची योजना आहे. त्यामुळे पक्षाचे सर्व शिलेदार आपली पूर्ण शक्ती पणाला लावत आहेत.

या मोर्चासाठीचं पोस्टरही मनसेने रिलीज केलंय. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे. परंतू... पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोर हे माझे बांधव नाहीत. त्यांना आपल्या देशातून हाकललेच पाहिजे अशी आक्रमक भूमिका मनसेने या पोस्टरमधून मांडलीय.

कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी मनसेच्या महामोर्चासाठी नवा मार्ग आखून दिलाय. गिरगाव चौपाटीवरून हा मोर्चा निघणार असून तो आझाद मैदानावर जाणार आहे. तिथे राज ठाकरे हे मोर्चाला संबोधित करणार आहेत.

First published: February 3, 2020, 2:05 PM IST

ताज्या बातम्या