मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BREAKING: मालाड मालवणीत इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती

BREAKING: मालाड मालवणीत इमारतीचा भाग कोसळला; ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती

part of building collapsed in Malad malvani Mumbai: मुंबईतील मालाड मालवणीत इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे.

part of building collapsed in Malad malvani Mumbai: मुंबईतील मालाड मालवणीत इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे.

part of building collapsed in Malad malvani Mumbai: मुंबईतील मालाड मालवणीत इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे.

मुंबई, 10 जून: मुंबईत आज दिवसभर मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर (Heavy rain in Mumbai) रात्रीच्या सुमारास इमारतीचा भाग कोसळून दुर्घटना घडली आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरात असलेल्या मालाड मालवणी (Malad Malvani) भागातील न्यू कलेक्टर कम्पाऊंड परिसरात एका चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला (Portion of building collapsed) आहे. इमारतीचा स्लॅब कोसळून शेजारील दोन मजली घरांवर पडला. या दुर्घटनेत काही नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस दाखल झाले आहेत. स्थानिक नागरिक सुद्धा घटनास्थळावर मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. मोठ्या वेगाने घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. पाऊस सुरू असल्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास मालाड मालवणीतील चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. इमारतीचा हा भाग थेट शेजारील दोन मजली घरांवर कोसळला.

ही इमारत अधिकृत होती की अनधिकृत आहे या संदर्भात अद्याप माहिती मिळू शकलेली नाहीये. पावसाळा सुरू होताच मुंबईत इमारत दुर्घटना घडण्याचं सत्र सुरू होतं. दरवर्षी अनेक इमारतींचा भाग कोसळून किंवा इमारत कोसळून मोठ-मोठ्या दुर्घटना घडत असतात. आज मुंबईत पहिला पाऊस होताच मालाडमध्ये दुर्घटना घडली आहे.

First published:
top videos

    Tags: Mumbai