मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती

संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली.

  • Published by:  Kranti Kanetkar
मुंबई, 29 फेब्रुवारी : संजय बर्वे यांच्या सेवानिवृतीमुळे रिक्त झालेल्या मुंबई पोलीस आयुक्तपदी परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परमबीर सिंग सध्या ACB चे महासंचालक आहेत. राज्य सरकारकडून त्यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीवर अखेर शिक्कामोर्तब झाला आहे. मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांची वर्णी लागली आहे. ठाकरे सरकारने परिपत्रक काढून ही घोषणा केली. संजय बर्वे मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. परमबीर सिंह यापूर्वी ठाण्याचे पोलीस आयुक्तही होते. सध्या परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. कोण आहेत परमबीर सिंह परमबीर सिंह हे 1988 बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. त्यांनी महाराष्ट्र पोलीस विभागातील अनेक पदांवर काम केलं आहे. महाराष्ट्राच्या पोलीस दलात 32 वर्ष सेवा करणारे परमबीर सिंह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक आहेत. मुंबई पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. त्यांनी 70 हजार कोटी सिंचन घोटाळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीन चिट दिली होती. चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्याचे एसपी म्हणूनही त्यांनी काम पाहिलं आहे. ते महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाचे उपप्रमुख देखील होते. महाराष्ट्र विधी व सुव्यवस्थेचे अतिरिक्त DGP म्हणून काम पाहिले आहे. हेही वाचा-मोठी बातमी, मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा हेही वाचा-नवी मुंबईत राजकीय खळबळ, शिवसेना नेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी हेही वाचा-शेफालीच्या आक्रमक खेळीमुळे भारताचा विजयी चौकार! श्रीलंकेला 7 विकेटनं दिली मात
First published:

Tags: Mumbai news, Mumbai police, Mumbai police commissioner, Uddhav tahckeray

पुढील बातम्या