S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • परळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO
  • परळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारतीत स्मशान शांतता पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 22, 2018 12:57 PM IST | Updated On: Aug 22, 2018 03:00 PM IST

    मुंबईतल्या परळ येथील क्रिस्टल टॉवरच्या १२ व्या मजल्याला सकाळी ८.३० च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाच्या १० ते १२ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आयुष्यभराची जमापूंजी लावलेल्या घराचं काही क्षणात होत्याचं नव्हतं होताना पाहताना अनेकांचे अश्रू थांबत नव्हते. आता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले असून आता इमारतीतील आतील भागांचे भयावह दृश्य समोर आले आहे. १६ मजली या इमारतीत १२ व्या मजल्यावर रिनोवेशनचे काम सुरू होते. कामादरम्यान शॉर्टसक्रिट झाले आणि आगीने भडका घेतला. या आगीत १२ व्या मजल्यावरची चारही घरं जळून खाक झाली. तसेच इमारतीत फायर फायटिंग सिस्टिम कार्यरत नसल्यामुळे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आग नियंत्रणात आणायला वेळ लागला. अतिरिक्त गाड्या आणि सामान आणावे लागले. याचा फटका तिथल्या रहिवाश्यांना बसला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close