Home /News /mumbai /

VIDEO: मुंबईजवळच्या रेल्वे स्टेशनवर अक्षरशः धबधबा! पुढच्या 3-4 तासांत जोर वाढणार, सावधान!

VIDEO: मुंबईजवळच्या रेल्वे स्टेशनवर अक्षरशः धबधबा! पुढच्या 3-4 तासांत जोर वाढणार, सावधान!

कामावरून परतणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असून प्रवाशी पाण्यातून वाट काढत चालले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

    मुंबई, 04 जुलै : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असून विशेषत: कोकण मुंबई, पुण्यात पावसाचा जोर आहे. पुढील 3 ते 4 तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि पुण्यातील घाटमाथ्या काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत माहिती दिली (Mumbai Rain Update) आहे. पनवेल आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. येथील खांदेश्वर रेल्वे स्थानकाच्या खालचा रस्ता पाण्याखाली गेला आहे. कामावरून परतणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत असून प्रवाशी पाण्यातून वाट काढत चालले आहेत. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत. पनवेल परिसरात अजूनही जोरदार पाऊस (Mumbai Rain) सुरूच आहे. स्थानिक प्रशासनाशी सल्लामसलत करून NDRF पथके राज्यात विविध ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. मुंबईसाठी 5 पथके, नागपूरला एक टीम, चिपळूणसाठी एक टीम, रत्नागिरी आणि महाड रायगड साठी एक टीम देण्यात आली आहे. हे वाचा - Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम दरम्यान, पुढील 5 दिवसांत मध्य भारत, पश्चिम किनारपट्टीवर मान्सून अधिक सक्रिय होण्याची स्थिती आहे. पश्चिम किनारपट्टीवरील जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमी दाबाचे क्षेत्र उत्तर ओडिशा व लगतच्या दक्षिण झारखंड भागात होऊ शकते. परिणामी महाराष्ट्रात येत्या 5 दिवसात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार-पाच दिवस मान्सून कोकणात अधिक सक्रिय होणार आहे. मुंबई ठाणे व आजूबाजूच्या परिसरात येत्या 4 ते 5 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai rain, Rain

    पुढील बातम्या