राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत

राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत.

  • Share this:

मुंबई, 22 जानेवारी : राज्य मंत्रिमंडळाच्या आज होणाऱ्या बैठकीत मंत्री पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाहीत. पंकजा मुंडे यांच्या आईची प्रकृती ठीक नसल्याने त्या बैठकीस उपस्थित राहणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची मंत्रालयात बैठक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही मंत्रिमंडळ बैठकांमध्ये विविध समाजघटकांना खूश करण्याकरता निर्णयांचा सपाटा लावण्यात आला आहे. तशी आणखी काही घोषणा आज होते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विशेष आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्यातील दुष्काळा संदर्भात चर्चा होणार असल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी म्हटले आहे. तसेच गेल्या मंत्रिमंडळ बैठकीत इतर राज्यात लागू करण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाचा अभ्यास करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्य सचिव डी के जैन यांना दिले होते. त्या संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे.


VIDEO : विनायक मेटेंचं नाव न छापल्यामुळे कार्यकर्त्याची डॉक्टरला मारहाणबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 12:14 PM IST

ताज्या बातम्या