जीएसटीपूर्वी जकात वसूल करण्याचा मुंबई महापालिकेचा सपाटा

जीएसटीपूर्वी जकात  वसूल करण्याचा मुंबई महापालिकेचा सपाटा

गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांहून अधिक जकात वसूल करण्यात आली असून अखेरच्या दोन दिवसांमध्ये साधारण ५० ते ५५ कोटी रुपये जकातीपोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकतील, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

  • Share this:

29 जून : १ जुलै रोजी संपूर्ण देशात एकच जीएसटी लागू होणार असल्याने मुंबई महापालिकेकडून आकारण्यात येणारा जकात कर बंद होणार आहे. या पाश्र्वभूमीवर पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाने अखेरच्या दोन दिवसांमध्ये मुंबईत माल घेऊन येणाऱ्यांकडून जकात वसुलीचा सपाटा लावला आहे.

गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल १७०० कोटी रुपयांहून अधिक जकात वसूल करण्यात आली असून अखेरच्या दोन दिवसांमध्ये साधारण ५० ते ५५ कोटी रुपये जकातीपोटी पालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकतील, असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत म्हणून जकातीकडे पाहिलं जातं. मात्र देशामध्ये ३० जूनच्या मध्यरात्रीपासून जीएसटी लागू झाल्यानंतर जकात कर बंद होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2017 10:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading