मुंबईत सफाई कामगार गुदमरले; एकाचा मृत्यू, 4 गंभीर

मुंबईत सफाई कामगार गुदमरले; एकाचा मृत्यू, 4 गंभीर

गॅस पाईपलाईन फुटली आणि कामगार गुदमरले अशी माहिती मिळाली आहे.

  • Share this:

उदय जाधव, मुंबई, 17 मार्च : भूमीगत नाल्यांची सफाई करणारे महानगरपालिकेचे 5 कंत्राटी कामगार गुदमरले आहेत. शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून 4 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दक्षिण मुंबईतील ( ग्रँटरोड पश्चिम ) नाना चौक स्काय वॉकच्या खाली असलेल्या नेसबाग बिल्डिंग शेजारी भूमीगत नाल्यांची साफसफाई करण्यात येत होती.  यावेळी 5 सफाई कामगार पाण्याची पाईपलाईन दुरूस्त करण्यासाठी खाली उतरले होते. त्यावेळी गॅस पाईपलाईन फुटली आणि कामगार गुदमरले अशी माहिती मिळाली आहे.

दरम्यान, महानगरपालिकेचा हलगर्जीपणा आणि सफाई कामगारांना देण्यात येणाऱ्या सोई-सुविधांच्या अभावामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत, असा आरोप आता करण्यात येत आहे. त्यामुळे सफाई कामगारांविषयी महानगरपालिकेची असंवेदनशीलता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

VIDEO : ' खोतकर 'मातोश्री'ला सलाम करुन येणार होते, पण गुलाम बनून आले'

First published: March 17, 2019, 7:51 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या