• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • Mumbai Fire: 247 मीटर उंच टॉवर, जीव वाचवण्यासाठी 19 व्या मजल्याच्या गॅलरीत लटकला, अखेर 10 मिनिटांनी खाली पडला, थरारक VIDEO

Mumbai Fire: 247 मीटर उंच टॉवर, जीव वाचवण्यासाठी 19 व्या मजल्याच्या गॅलरीत लटकला, अखेर 10 मिनिटांनी खाली पडला, थरारक VIDEO

247 मीटर उंच टॉवरला आग, 'तो' 19 व्या मजल्याच्या गॅलरीत लटकला अन् 10 मिनिटांनी खाली पडला, थरारक VIDEO

247 मीटर उंच टॉवरला आग, 'तो' 19 व्या मजल्याच्या गॅलरीत लटकला अन् 10 मिनिटांनी खाली पडला, थरारक VIDEO

Mumbai Fire man fall from building live video: मुंबईतील लालबाग परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली आहे. या घटनेत एका व्यक्तीचा इमारतीवरुन पडून मृत्यू झाला आहे.

  • Share this:
    मुंबई, 22 ऑक्टोबर : मुंबईतील लालबाग आणि करी रोड (Curry Road) परिसरात असलेल्या वन अविघ्न पार्क (One Avighna Park) इमारतीला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. ही इमारत 60 मजली असून तिची उंची तब्बल 247 मीटर इतकी आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा इमारतीच्या गॅलरीतून पडून मृत्यू (One died after jump from building) झाला आहे. आपला जीव वाचवण्यासाठी एक इसम इमारतीच्या गॅलरीत आला. जवळपास 10 मिनिटे हा व्यक्ती गॅलरीत लटकून होता. अखेर 10 मिनिटांनी तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. वाचा : मुंबईत वन अविघ्न पार्क इमारतीला आग मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीत काम सुरू असलेला कामगार असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की त्या इसमाने आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या इसमाने इमारतीवरुन उडी घेतली. या इसमाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र, उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. या इमारतीत अद्यापही दोन नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, इमारत उंच असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यात अडचणी येत आहेत. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सुद्धा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमी व्यक्तीला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, इमारतीमधून रहिवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. इमारतीत काही काम सुरू होते आणि त्यावेळी आगीची ठिणगी उडून ही आग लागली असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, ही आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. राम तिवारी नावाची व्यक्ती लटकत होती. 10 मिनिटांपेक्षा जास्त ही व्यक्ती लटकत होती. खाली पडल्याने त्याला दुखापत झाली होती उपचारा दरम्यान त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. राम तिवारी ज्यावेळी इमारतीला लटकत होते. त्यादरम्यान थोडी समयसूचकता दाखवली असती, पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता. मृत राम तिवारी या इमारतीतलाच कामगार होता, असं महापौर म्हणाल्या आहेत.
    Published by:Sunil Desale
    First published: