Home /News /mumbai /

मुंबईची लाईफस्टाईल सर्वात भारी!, पुणे देखील एका प्रकारात नंबर 1

मुंबईची लाईफस्टाईल सर्वात भारी!, पुणे देखील एका प्रकारात नंबर 1

मुंबईकर (Mumbai) आणि पुणेकरांसाठी (Pune) एक आनंदाची बातमी! आयआयटी-बॉम्बे (IIT-Bombay) च्या संशोधकांनी देशातील प्रमुख महानगरांचा अभ्यास करुन एक यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार मुंबईची लाईफस्टाईल देशात सर्वात भारी ठरली आहे. तर साक्षर शहरांच्या यादीमध्ये पुणे नंबर 1 आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई 6 डिसेंबर:  मुंबईकर (Mumbai) आणि पुणेकरांसाठी (Pune) एक आनंदाची बातमी! आयआयटी-बॉम्बे (IIT-Bombay) च्या संशोधकांनी देशातील प्रमुख महानगरांचा अभ्यास करुन एक यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये देशातील महानगरांना तेथील नागरिकांच्या जीवनशैलीच्या आधारे रँकिंग देण्यात आले आहे. या यादीत मुंबईने पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, साक्षर महानगरांच्या गटात पुणे नंबर 1 ठरले आहे. चेन्नई (Chennai) हे महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर असल्याचे समोर आले आहे. मुंबई – पुणेचा दबदबा! एखाद्या महानगराचा विचार करताना त्या शहरातील पायाभूत सुविधा, उद्योगधंदे, हवामान, दळणवळणाची साधने, भौगोलिक स्थान याचा विचार अनेकदा केला जातो. अर्थात या सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक देखील आहे. त्याचबरोबर ते महानगराचा तिथे राहणाऱ्या नागरिकांना कसे वाटते हा त्या शहराबाबत मत ठरवण्याचा सर्वात महत्वाचा निकष आहे. महानगरातील एकंदरीत लाईफ स्टाईलमध्ये मुंबईची लाईफ स्टाईल सर्वात भारी ठरली आहे. देशातील एकूण 14 महानगरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात मुंबईने प्रथम क्रमांक पटकावलाय. त्यांतर दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई यांचा नंबर आहे. साक्षर महानगरांच्या यादीत पुणे (91 टक्के) प्रथम क्रमांकावर आहे. तर आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत हैदराबाद (83 टक्के) सर्वात शेवटचा क्रमांक आहे. लैंगिक समानतेचा विचार आयआयटी बॉम्बेच्या संशोधकांनीही या प्रथमच सर्वेक्षणात लैंगिक समानतेचा (Gender equality) चा विचार करण्यात आला आहे. लैंगिक समानतेच्या निकषावर चेन्नईने बाजी मारली आहे. मुंबई आणि कोलकाता या शहरांना मागे टाकत चेन्नईने पहिला क्रमांक पटकावला आहे. या यादीत बिहारची राजधानी पाटणाचा शेवटचा क्रमांक आहे. लैंगिक समानतेच्या निकषांमध्ये चेन्नईसह कोलकाता आणि मुंबई या शहरांनीच किमान पात्रतेची मर्यादा ओलांडली आहे. पाटणासह इंदूर आणि जयपूर हे शहर या यादीमध्ये तळाशी आहेत. महिलांशी निगडीत गुन्हे होण्याचे प्रमाण जयपूरमध्ये सर्वात जास्त असून चेन्नईमध्ये सर्वात कमी आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai, Pune

    पुढील बातम्या