'नाईट लाईफ'म्हणजे फक्त दारु पिणं, भाजपच्या नेत्याचं वक्तव्य

'नाईट लाईफ'म्हणजे फक्त दारु पिणं, भाजपच्या नेत्याचं वक्तव्य

'अधिकृतरित्या नाही तर चोरुन लपून दारु विकली जाईल. जर रोजगार आणि व्यवसायाला चालना द्यायचा असेल तर कारखाने उभारावे.'

  • Share this:

मुंबई 21 जानेवारी : नाईटलाईफमुळे महिलांची सुरक्षा धोक्यात येईल असं मत भाजपचे नेते राज पुरोहित यांनी व्यक्त केलंय. निर्भया सारख्या घटना या दारु पिऊनच झल्या आहे. मी दहा वर्षापासून नाईट लाईफचा विरोध करत आलोय. पाच वर्षापूर्वी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा मुद्दा मांडत नाईटलाईफला विरोध केला होता. आज त्याच पोलिसांनी  कशी परवानगी दिली असा सवाल देखील पुरोहित यांनी केलाय. काही वर्षांपूर्वी ज्यावेळी नाईटलाईफ चा मुद्दा पुढे आला होता त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या विरोधाचे समर्थन केलं होतं. विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही या संस्कृतीचे समर्थन करणार नाहीत. नाईट लाईफ म्हणजे फक्त दारु पिणे असा माझा समज आहे.

अधिकृतरित्या नाही तर चोरुन लपून दारु विकली जाईल. जर रोजगार आणि व्यवसायाला चालना द्यायचा असेल तर कारखाने उभारावे असा सल्लाही राज पुरोहित यांनी दिलाय. दारु पिणे, रात्री डांस करणे ही आपली संस्कृती नाही आपली संस्कृती ही रामकृष्णाची आहे, संत कबीराची आहे.

अखेर तो वादग्रस्त VIDEO हटवला; शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदी

नाईटलाईफ सुरु करण्याच्या निर्णयापूर्वा लोकांची मते जाणून घेतली पाहिजे. या मुद्यावर विधीमंडळात चर्चा व्हायला पाहिजे. भाजपा पक्षाची अधिकृत भूमिका हे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील जाहीर करतीलच. मात्र एक सुजाण मुंबईकर म्हणून मी सदैव नाईटलाईफचा विरोधच करणार असा पावित्रा राज पुरोहितांनी घेतला आहे.

'रेल्वे स्टेशनबाहेरची हॉटेल्स खुली ठेवा'

26 जानेवारीपासून मुंबईतील मॉल्स आणि मिल कंपाऊंड मधील हॉटेल 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला तरी हॉटेल व्यावसायिक मात्र या निर्णयाने खुश नाहीत. कारण त्यांच्यामते  या निर्णयाने मॉल्स मधील हॉटेल कितीही दर आकारातील याची भीती तर आहेच पण त्यांची मग मक्तेदारी होईल असाही एक सूर हॉटेल व्यावसायिकांचा आहे.

त्या जुळ्यांना रस्त्यावर टाकणारी आई सापडली, प्रेम प्रकरणातून झाली होती मुलं

इतकंच काय पण जे पर्यटक मॉल पर्यंत पोहोचणार नाहीत अशांसाठी रेल्वे स्टेशन बाहेरचे हॉटेल खुले ठेवण्याची मागणी आहार ने केलीय. मुंबईतील प्रमुख रेल्वे स्टेशन म्हणजेच सिएसएमटी, दादर, बांद्रा, कुर्ला या न अशा प्रमुख स्टेशन बाहेरील हॉटेल खुली ठेवावी. ज्यामुळे आंतरराज्यीय पर्यटकांना खाण्यासाठी कुठे भटकायला नको, कारण अनेक मेल एक्सप्रेस या रात्रभर मुंबईत येत असतात.

First published: January 21, 2020, 6:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading