मुंबई, 23 डिसेंबर : मुंबईत रात्री 11 ते पहाटे 6 वाजेपर्यत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. पण या निर्णयानंतर आम्ही रात्री घराबाहेर पडायचं की नाही, याबाबत अनेक नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक महत्त्वाचं आवाहन केलं आहे.
नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या नाईट कर्फ्यूमधून सूट देण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस दलाचे कायदा सुव्यवस्थेचे पोलीस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. मात्र हॉटेल, पब, बार, रेस्टॉरंट तसंच करमणूक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना ही सूट लागू होणार नाही, असंही
ते म्हणाले.
रात्रीही तुम्ही रस्त्यावर फिरू शकता, पण...
नाईट कर्फ्यूमध्ये तुम्ही टू व्हिलरने फिरु शकता, पायी फिरु शकता, तसंच चारचाकी गाडीनेही देखील घराबाहेर पडू शकता. मात्र गाडीत चारपेक्षा जास्त जण नसतील याची खबरदारी घ्यावी. कारण हा कर्फ्यू मुंबईकरांच्या सुरक्षिततेकरता असून सुरक्षेपायी हा कर्फ्यू लावण्यात आल्याची माहिती विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.
मुंबईपाठोपाठ पुण्यातही घेतला मोठा निर्णय, विमान प्रवाशांना कोरोना टेस्टची सक्ती
दरम्यान, ख्रिसमस सण साजरा करण्याबाबतही राज्य सरकारने महत्त्वपूर्ण आदेश काढले आहेत. यंदा ख्रिसमस सण साध्या पद्धतीने साजरा करतानाच चर्चमध्ये 50 पेक्षा जास्त लोक प्रार्थना सभेला उपस्थित राहू नये, तसंच चर्चमध्ये कोणत्याही प्रकारे गर्दी होणार नाही, सामाजिक सुरक्षिततेचे अंतर नियमावली काटेकोर पद्धतीने पाळली जावी असे आदेश दिले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.