• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • महत्त्वाची बातमी, 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार?

महत्त्वाची बातमी, 11 वीच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा होणार?

दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे, पण...

 • Share this:
  मुंबई, 09 मे : राज्यात कोरोनाच्या (Maharashtra corona case) परिस्थितीमुळे शिक्षण व्यवस्था पुरती कोलमडून गेली आहे. पहिली ते 9 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पास करण्यात आले आहे. दहावीची परीक्षा (SSC exam) सुद्धा पुढे ढकलण्यात आली आहे. आता 11 वीच्या प्रवेशासाठी (11 th admission 2021) सीईटी परीक्षेचा विचार केला जात आहे. दहावीच्या परीक्षा कोरोनाच्या परिस्थितीमुळे घेता आल्या नाही. त्यामुळे आता पुढील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना कसा प्रवेश घेता येईल, याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. शिक्षण मंडळाकडून अकरावीत प्रवेश करण्यासाठी सामायिक परीक्षा घेण्याबाबत चाचपणी करत आहे. माणुसकीही विकून खाली, रेमडेसीवीर इंजेक्शनच्या रिकाम्या कुप्यात पाणी भरून विकले! त्यामुळे शिक्षण विभागाकडून आता १० वीच्या विद्यार्थ्यांचं अंतर्गत मुल्यमापन केले जाणार आहे. यासाठी शिक्षण विभाग एक सर्वेक्षण करणार असल्याची माहिती मिळत आहे. शिक्षण विभाग सर्व शाळांना लिंक शेअर करून माहिती गोळा करणार आहे. यात दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन मतं सुद्धा नोंदवता येणार आहे. या सर्वेक्षणानंतर एक अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर सामायिक परीक्षा घेण्याबद्दल निर्णय घेतला जाईल. मागील महिन्यात दहावीची परीक्षा रद्द करुन विद्यार्थ्यांना प्रमोट करण्यात यावे यासंदर्भात मंत्रिमंडळात एकमताने निर्णय घेण्यात आला होता. दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांचं इंटरनल असेसमेंट होणार असून त्या संदर्भात शिक्षण क्षेत्रातील तज्ञांसोबत चर्चा करुन सविस्तर माहिती जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. पुण्यात 14 महिन्यात 4लाख जणांनी कोरोनाला हरवलं, रुग्ण बरं होणाऱ्याचं वाढलं दहावीच्या शाळा यंदा ऑनलाईन पद्धतीने झाल्या त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता देशातील इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाला घ्यावा लागला होता.
  Published by:sachin Salve
  First published: