Home /News /mumbai /

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आजपासून 62 खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू

मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आजपासून 62 खासगी रुग्णालयात लसीकरण सुरू

औषधाविना बरे होऊ शकतात कोरोना व्हॅक्सीनेचे साईड इफेक्ट

औषधाविना बरे होऊ शकतात कोरोना व्हॅक्सीनेचे साईड इफेक्ट

मुंबईत 71 खासगी रुग्णालयात, 10 आणि 11 एप्रिल असे दोन दिवस लसीकरण थांबले होते.

    मुंबई, 12 एप्रिल : राज्यात कोरोना (maharashtra corona case) परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरणावर ( Corona Vaccination) भर देण्यात आला होता. पण, लशीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबवण्यात आले होते. अखेर बृहन्मुंबई महानगरपालिकेला (mumbai municipal corporation) कोविड-19 लस साठा उपलब्ध झाला असून आज 71 पैकी 62 खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि शासन यांच्यातर्फे मुंबईत 49 तर खासगी रुग्णालयात 71 लसीकरण केंद्र कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. या सर्व केंद्रांवर मिळून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्रतिदिन सरासरी 40 ते 50 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. Maharashtra lockdown : राज्यात 14 किंवा 7 दिवसांचा लॉकडाऊन, लवकरच शिक्कामोर्तब? मुंबईत लसीकरणासाठी मंजुरी मिळालेल्या 71 खासगी रुग्णालयात 10 आणि 11 एप्रिल असे दोन दिवस लसीकरण थांबले होते. तथापि, मुंबई महानगरपालिकेच्या तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये लसीकरण सुरू होते. लससाठा अधिक प्रमाणावर उपलब्ध होताच खासगी रुग्णालयातही लसीकरण पुनश्च सुरू केले जाईल, असे महानगरपालिकेने यापूर्वीच स्पष्ट केले होते. राज्यात एकाच आठवड्यात 4 लाख रुग्णांची भर, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत माहितीसमोर शुक्रवार, दिनांक 9 एप्रिल 2021 रोजी रात्री उशिरा 99 हजार लसी आणि 10 एप्रिल रोजी 1 लाख 34 हजार 970 अश्या एकूण 2 लाख 33 हजार 970 लसींच्या मात्रा मागील दोन दिवसात बृहन्मुंबई महानगरपालिकेला उपलब्ध झाल्या आहेत. त्यातून खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रासाठी लस साठा वितरित करण्यात आला आहे. यामुळे सोमवार, दिनांक 12 एप्रिल 2021 रोजी नियमित वेळेत 71 पैकी 62 खासगी लसीकरण केंद्र देखील कार्यान्वित राहतील.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Mumbai

    पुढील बातम्या