मुंबई, 04 जून: मुंबई (Mumbai News) शहरात गेल्या 24 तासाच्या आत तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. या तिन्ही घटना आगी (Fire News) शी संबंधित आहेत. पहिली घटना ही बदलापूर (Badlapur) भागात तर दुसरी भिवंडीत (Bhiwandi) आणि तिसरी ओशिवरा (Oshiwara) येथे घडली आहे. आता आपण या तिन्ही घटनांचे सविस्तर वृत्त पाहूया.
बदलापूर गॅस गळती
बदलापूर एमआयडीसी (Badlapur MIDC) परिसरात केमिकल वायूची गळती (Chemical Gas leak) झाली. या वायू गळतीमुळे स्थानिक नागरिकांना श्वास घेण्यास त्रास निर्माण झाल्याचं वृत्त समोर आलं. इतकेच नाही तर काही नागरिकांना उलट्या, पोटात मळमळ होण्याचाही त्रास जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे.
#WATCH | A gas leak from a factory in Maharashtra's Badlapur was reported at around 10:22 pm on Thursday. People in the area were having trouble breathing. Fire brigade stopped the leak at 11:24 pm. The situation is under control. No one injured: Thane Municipal Corporation pic.twitter.com/djdZY77DAE
— ANI (@ANI) June 3, 2021
बदलापूर एमआयडीसी भागात वायू गळती झाल्याने नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. या वायू गळतीमुळे शिरगांव आपटेवाडी या परिसरातील अनेक रहिवाशांना श्वसनाचा त्रास झाला तर काहींना उलट्या आणि खोकल्याचा त्रास जाणवू लागला. या भागात हवेत हा वायू पसरला होता. यासंबंधीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आणि त्यांनी संबंधित परिसराची पाहणी केली.
एमआयडीसी भागातील नोबल इंटर मीडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतून या वायूची गळती झाली. कंपनीमध्ये एका रिॲक्टरमध्ये क्रुड ऑईल साठीच सल्फ्युरिक ॲसिड आणि बेंझाईन डिहायड्रेड या दोन केमिकल्स मिश्रण सुरू होतं. मात्र त्यासाठी लागणारा तापमान नियंत्रित करताना चूक झाल्याने या रिॲक्टरमधून वायुगळती झाली. मात्र हा वायू ज्वलनशील नाही, श्वास घेण्यास हा वायू त्रासदायक ठरणारा असून त्वचा, डोळे,यांना काही प्रमाणात बाधा करणारा आहे.
भिवंडीत गोदामाला भीषण आग
ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्ये रात्री गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत जवळपास 15 गोदामं जळून खाक झाली. सुदैवानं य आगीत जीवितहानी टळली असून मोठं आर्थिक नुकसाना झालं आहे. अग्नीशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.
ओशिवरामध्ये इमारतीला आग
#WATCH | Maharashtra: A level 2 fire broke out in Aashiyana Tower in Mumbai's Oshiwara, this morning. More details awaited. pic.twitter.com/zPufvpovmE
— ANI (@ANI) June 4, 2021
आज सकाळी जोगेश्वरी येथील ओशिवरामध्ये एका रहिवाशी इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली. आशियाना नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. 8 फायर इंजिन, 8 जंम्बो टँकर घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवानं या आगीत अद्याप जीवितहानीचं वृत्त नाही आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.