बदल होतोय! मुंबईकरांनो, शहाण्यासारखं वागल्याबद्दल अभिनंदन! नोंदवला नवा विक्रम

बदल होतोय! मुंबईकरांनो, शहाण्यासारखं वागल्याबद्दल अभिनंदन! नोंदवला नवा विक्रम

ऐन दिवाळीत शहरांमधलं वातावरण श्वास घ्यायच्या लायकीचं राहात नाही, कारण फटाक्यांच्या धुरामुळे होणारं प्रदूषण. पण मुंबईकरांनी यंदा आवाजी फटाके कमी वाजवले आणि मुंबईचं आकाशही धूर न कोंडल्यामुळे स्वच्छ राहिलं. कमी प्रदूषणाचा विक्रमच मुंबईने नोंदवला.

  • Share this:

स्वाती लोखंडे ढोके

मुंबई, 28 ऑक्टोबर : ऐन दिवाळीत शहरांमधलं वातावरण श्वास घ्यायच्या लायकीचं राहात नाही, कारण फटाक्यांच्या धुरामुळे होणारं प्रदूषण. पण यंदा कमी प्रदूषण करणारे फटाके मुंबईकरांनी उडवले. कमी प्रदूषणाचा विक्रमच मुंबईने नोंदवला. कारण मुंबईच्या हवेचा दर्जा लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी चांगला होता आणि ध्वनीप्रदूषणही यंदा फारच कमी झालं. राजधानी दिल्लीत मात्र दृश्यमानता कमी होईल इतकं प्रदूषण हवेत होतं आणि अजूनही हवा वाईट आहे.

आवाज ही सामाजिक संस्था मुंबईच्या ध्वनिप्रदूषणाची निरीक्षणं नोंदवले. लक्ष्मीपूजनाच्या वेळी आणि त्यानंतर मुंबई आणि उपनगरांत वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं ध्वनीप्रदूषण या संस्थेनं नोंदवलं. या वर्षी गेल्या 15 वर्षांतलं सर्वांत कमी ध्वनीप्रदूषण झाल्याची त्यांनी नोंद केली आहे.

वाचा - अमिताभ बच्चन यांच्या दिवाळी पार्टीत पोहोचले बॉलिवूड तारे-तारका,PHOTOS पाहिलेत का

सर्वोच्च न्यायालयाने ध्वनीप्रदूषणाच्या मर्यादेबाबत नियम घालून दिले आहेत. त्यानुसार 125 डेसिबलपेक्षा जास्त आवाज करणं कायद्याने गुन्हा आहे. तरीही दरवर्षी दिवाळीच्या संध्याकाळी अनेक शहरांमध्ये आवाजाची पातळी यापेक्षा जास्त असते. याअगोदर 142, 145 डेसिबल अशी आवाजाची पातळी नोंदवण्यात आली होती. या वर्षी मात्र 112 डेसिबलपर्यंतच प्रदूषण नोंदवलं गेलं. आवाजाची पातळी 85 डेसिबलच्या पुढे गेली तरी मानवी कानांना त्रास होतो. अशा वेळी सतत 100 डेसिबलच्या पुढचा आवाज ऐकल्याने श्रवणक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

वाचा - 'आत्महत्येची वेळ येऊ देऊ नका', शिवसैनिकांनीच उद्धव ठाकरेंना रक्ताने लिहिलं पत्र

राजधानी दिल्लीत मात्र या वेळीसुद्धा प्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडली होती. लक्ष्मीपूजनाचा दिवस उत्तर भारतात बडी दिवाली म्हणून साजरा होतो. त्या दिवशी दिल्लीकरांनी उडवलेल्या बेसुमार फटाक्यांमुळे आज सकाळी दिल्लीचं आकाश काळवंडलं होतं. धुरकं - SMOG मुळे दृश्यमानताही कमी झाली होती. गेल्या वर्षीपेक्षा प्रदूषणाची पातळी कमी असली, तरी दिल्लीची हवा अत्यंत खराब दर्जाची होती. श्वसनाला त्रास होईल असे प्रदूषित कण हवेत मोठ्या प्रमाणावर होते.

अन्य बातम्या

पराभव झाल्यानंतरही पंकजा मुंडे होणार मंत्री?

फिका पडला विराट-अनुष्काचा हॉट लुक, सोशल मीडियावर चर्चा फक्त झिवाची!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 05:50 PM IST

ताज्या बातम्या