मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई पालिकेनं 2 दिवसांत लोकांकडून वसूल केले तब्बल 44 कोटी रुपये, कारण...

मुंबई पालिकेनं 2 दिवसांत लोकांकडून वसूल केले तब्बल 44 कोटी रुपये, कारण...

मुंबई महापालिकेच्या हद्दीत महापालिकेने तब्बल दोन हजाराहून अधिक मार्शलची नेमणूक केलेली आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत महापालिकेने तब्बल दोन हजाराहून अधिक मार्शलची नेमणूक केलेली आहे.

मुंबई महापालिकेच्या हद्दीत महापालिकेने तब्बल दोन हजाराहून अधिक मार्शलची नेमणूक केलेली आहे.

मुंबई, 21 मार्च :  मुंबई महापालिकेनं (mumbai municipal corporation) थोडेथोडके नाही तर तब्बल 44 कोटी रुपये अवघ्या दोन दिवसात मुंबईकरांकडून वसूल केले आहे. हे पैसे कुठल्या करायचे नाहीत तर दंडाचे आहेत. मुंबई महापालिका हद्दीत मास्क (Mask) न घालणाऱ्या विरोधात कारवाई करत हा दंड वसूल केला आहे.

कोरोनाशी सामना करत असताना मास्क नियमितपणे वापरा असं वारंवार मुंबई पालिकेकडून सांगितले जाते. पण तरीही काही महाभाग हे मास्क वापरण्याचे टाळतात. त्यामुळेच मुंबई पालिकेकडून मास्कचा वापर न करणाऱ्या नागरिकांना दोनशे रुपयांचा दंड ठोठावला जातो. 19 आणि 20 मार्चला मुंबई महापालिकेच्या हद्दीत महापालिकेचे मार्शल मुंबई पोलीस आणि रेल्वे मार्शल च्या माध्यमातून तब्बल 44 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. तब्बल 2 कोटीहून अधिक लोकांना हा दंड भरावा लागल्यामुळे ही रक्कम 44 कोटीच्या घरात गेली आहे.‌

प्रियांकाला करायचं नव्हतं निकसोबत लग्न; कारण वाचून बसेल धक्का

मुंबई महापालिकेच्या हद्दीत महापालिकेने तब्बल दोन हजाराहून अधिक मार्शलची नेमणूक केलेली आहे. विविध सार्वजनिक ठिकाणी जाऊन मास्क घालणाऱ्या लोकांच्या विरोधात कारवाई करतात. असाच अधिकार मुंबई पोलिसांना सुद्धा देण्यात आलेला आहे आणि रेल्वेमध्ये रेल्वे स्थानकावर अशा पद्धतीने कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रत्येक रेल्वे लाईनवर प्रत्येकी शंभर याप्रमाणे तीन लाईनवर 300 मार्शल ची नेमणूक केलेली आहे.

महिनाभरात तिप्पट मृत्यू, महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने माजवला हाहाकार

हे मार्शल रेल्वेतून प्रवास करणाऱ्या रेल्वे स्थानकांवर असलेल्या लोकांवर नजर ठेवून असतात आणि मास्क न करणाऱ्या लोकांना दोनशे रुपयांचा दंड करतात. मुंबई महापालिकेने 19 मार्चला तब्बल 19 लाख 92 हजार 500 लोकांकडून तब्बल 40 कोटी 21 लाख 30 हजार 200 रुपये गोळा केले आहेत. तर 20 तारखेला महापालिकेने केवळ 14 हजार 142 लोकांना दंड ठोठावत 28 लाख 28 हजार चारशे रुपये गोळा केले आहेत. त्यामुळे मुंबई महापालिकेने या दोन दिवसात तब्बल 20 लाख 6 हजार 642 लोकांवर कारवाई करत 40 कोटी 49 लाख 58 हजार 900 रुपये गोळा केल्या आहेत.

मुंबई पोलिसांनी 19 तारखेला एक लाख 78 हजार 899 लोकांवर कारवाई करत 3 कोटी 57 लाख 79 हजार 800 रुपये गोळा केले आहेत. तर 20 तारखेला 6789 लोकांवर कारवाई करत 13 लाख 57 हजार आठशे रुपये गोळा केले. अशाच प्रकारे रेल्वेतून 2 दिवसांत 2 कोटी 78 लाख रुपये गोळा केलेले आहेत. या सर्वांची बेरीज केली तर महापालिकेने केवळ दोन दिवसात दोन कोटी लोकांना दंड ठोठावला आहे आणि त्यांच्याकडून 44 कोटी रुपये गोळा केले आहेत.

First published:

Tags: BMC, Mumbai muncipal corporation, मुंबई