मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबई हळहळली, संक्रांतीच्या खेळाचा भयंकर शेवट! पतंगाच्या नादात 10 वर्षांचा मुलाचा गाईच्या शेणात गुदमरून मृत्यू

मुंबई हळहळली, संक्रांतीच्या खेळाचा भयंकर शेवट! पतंगाच्या नादात 10 वर्षांचा मुलाचा गाईच्या शेणात गुदमरून मृत्यू

संक्रांतीच्या दिवशी मुंबई हादरली. पतंगाचा खेळ इतक्या करुण पद्धतीने जीव घेईल याचा विचारही या चिमुरड्याच्या घरच्यांनी केला नसेल. पतंग पकडण्यासाठी तो धावला आणि गोठ्याजवळच्या शेणाने भरलेल्या टाकीत पडला....

मुंबई,  14 जानेवारी:  संक्रांतीनिमित्त पतंग उडवायला बाहेर पडलेला मुलगा घरी परतलाच नाही आणि त्याचा शेवट इतक्या भयंकर पद्धतीने झाला असेल याची कल्पनाच कुणी केली नसेल. मुंबईत संक्रांतीच्या दिवशी दुपारी जो प्रकार घडला त्याबद्दल वाचूनही अंगावर काटा येईल. कांदिवलीत राहणाऱ्या दुर्वेश जाधव नावाच्या 10 वर्षांच्या मुलाचा शेणाच्या ढिगात बुडून मृत्यू झाला आहे. संक्रांतीच्या दिवशीच या भयंकर बातमीने मुंबई हादरली आहे. पतंगाचा खेळ इतक्या करुण पद्धतीने जीव घेईल याचा विचारही या चिमुरड्याच्या घरच्यांनी केला नसेल. गुरुवारी दुपारी दुर्वेश जवळच्या इतर मित्रांबरोबर पतंग उडवायला बाहेर पडला होता. एका काटलेल्या पतंगाच्या मोहात तो त्याच्या मागे धावत राहिला.  पतंग पकडण्यासाठी गोठ्याशेजारच्या शेणाच्या मोठ्या ढिगाजवळ तो गेला. त्या शेणाच्या ढिगावरच नेमका पतंग जाऊन पडला. दुर्वेशने त्यावर उडी मारली आणि काही अंदाज यायच्या आतच त्याचा पाय खोलात गेला. शेणाने भरलेल्या त्या जागेत तो अक्षरशः बुडू लागला. मदतीसाठी आरडा ओरडा सुरू झाला. प्रचंड गलका वाढला. पण त्या शेणाच्या टाकीत उतरणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकण्यासारखं होतं. दुर्वेशला वाचवण्यासाठी आलेले हतबल झाले. तो शेणात दिसेनासा होईपर्यंत कुणीच काही करू शकलं नाही. पोलीसांनाही घटनास्थळी पोहोचूनही तातडीने त्या शेणात उतरवणं शक्य नव्हतं. अग्निशमन दलाचे जवान येईपर्यंत कुणाला काहीच करता आलं नाही. शेजारच्या इमारतीच्या कामावर असलेल्या मजुरांनी क्रेनच्या साहाय्याने दुर्वेशला बाहेर काढलं. अखेर सर्व आयुध घेऊन दुर्वेशपर्यंत पोहोचेपर्यंत त्या चिमुरड्याचा शेणात गुदमरून जीव गेला होता. कांदिवलीच्या रुग्णालयात त्याला दाखल केलं, तेव्हाच त्याचा जीव गेलेला होता. पोलिसांनी या प्रकरण अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. कांदिवली पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.
First published:

Tags: Mumbai

पुढील बातम्या