मुंबई, 17 ऑगस्ट : मुंबई महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भातील महत्त्वाचा आदेश सोमवारी काढला. गणेश मूर्तीचं थेट विसर्जन करायला मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. Coronavirus चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि विसर्जनाला होणारी गर्दी टाळण्यासाठी महापालिकेने काही उपाययोजना आखल्या आहेत. त्यानुसार थेट विसर्जन न करता नागरिकांनी महापालिकेकडे मूर्ती सुपूर्द करावी आणि महापालिका विसर्जन करेल, असं सांगण्यात आलं आहे.
मुंबईत थेट गणेश विसर्जन करता येणार नाही, असे आदेश बृहन्मुंबई महापालिकेने काढले आहे. त्याऐवजी जागोजागी सुरू होणाऱ्या संकलन केंद्रात विसर्जनसाठी मूर्ती जमा कराव्यात, असं आयुक्तांनी म्हटलं आहे. महापालिकेने साहाय्यक आयुक्तांना सर्व विभागांमध्ये विसर्जन मूर्ती संकलन केंद्र उभारण्याचे आदेश दिले आहेत.
नेमके पर्याय काय?
घरच्या घरी विसर्जन करण्याला प्राधान्य द्यावं
घराबाहेर पारंपरिक पद्धतीने विसर्जन करायचं असेल तर मूर्ती महापालिकेकडे जमा कराव्यात.
महापालिकेच्या वतीने विसर्जन केलं जाईल. त्यासाठी प्रत्येक विभागात 7 ते 8 संकलन केंद्र सुरू केली जाणार आहेत.
संकलन केंद्र किंवा फिरत्या संकलन केंद्रात मूर्ती द्यावी लागेल.
कृत्रिम 167 ठिकाणी, नैसर्गिक विसर्जन केंद्रावरही थेट विसर्जनाला बंदी असेल.
मुंबई महापालिका गणेशमूर्तींचं विसर्जन करणार
कोरोनाचा अधिक संसर्ग न होण्यासाठी मूर्ती संकलनाची मोहीम
गणेशमूर्तींचं आगमनही 3-4 दिवस आधी करण्याचं आवाहन
मोठ्या मिरवणूक न काढता आटोपशीर पद्धतीने गणेश आगमन आणि विसर्जन करण्याचं आवाहन
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.