मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

NIA चा आणखी एक मोठा खुलासा, स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध नाही!

NIA चा आणखी एक मोठा खुलासा, स्फोटकांनी सापडलेल्या कार प्रकरणाचा दहशतवादी संघटनेशी संबंध नाही!

ज्या वेळी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यावेळी एका दहशतवादी संघटनेनं टेलिग्रामवरून एक मेसेज दिला होता.

ज्या वेळी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यावेळी एका दहशतवादी संघटनेनं टेलिग्रामवरून एक मेसेज दिला होता.

ज्या वेळी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यावेळी एका दहशतवादी संघटनेनं टेलिग्रामवरून एक मेसेज दिला होता.

मुंबई, 14 मार्च : मुंबईत स्फोटकांनी भरलेली कार सापडल्या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze arrested) यांना एनआयएच्या (NIA) पथकाने अटक करण्यात आली आहे. सचिन वाझे यांच्या अटकेनंतर आता नव-नवीन खुलासे होत आहे. या प्रकरणाचा दहशतवाद्यांशी कोणताही (Terrorist connections) संबंध नव्हता आणि टेलिग्रामवर (telegram) पाठवण्यात आलेला मेसेज हा खोटा होता, असा खुलासा एनआयएने केला आहे. मुंबईमध्ये जिलेटिन स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा अखेर एनआयएच्या पथकाने छडा लावला आहे. स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणात दहशतवादी संघटनेशी कोणताही संबंध नाही. स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवण्याची जबाबदारी एका दहशतवादी संघटनेनं घेतली होती. तो टेलिग्रामवरील मेसेज निव्वळ खोडसाळपणा होता, अशी माहिती NIA च्या दिल्ली स्पेशल सेलने दिली आहे. जैश अल हिंद नावाने कोणतीही संघटना नाही. मात्र, गाडी मायकल रोडवर ठेवण्याचा उद्देश अस्पष्ट आहे. (हेही वाचा - शोपियानमध्ये चकमक, एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश) ज्या वेळी स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ गाडी सापडली होती. त्यावेळी  इंडियन मुजाहिद्दीन आणि तिहार कनेक्शन समोर आले होते. या कारमध्ये सापडलेले धमकीचे पत्र ज्या टेलिग्राम चॅनलवरुन देण्यात आले होते, ते टेलिग्राम चॅनल (Telegram channel) दिल्लीतील तिहार कारागृहात (Tihar Jail) तयार करण्यात आले होते, अशी माहिती समोर आली होती. पण, तपासाअंती हे सर्व खोटे असल्याचे समोर आले आहे. अखेर सापडली ती पांढरी गाडी दरम्यान, स्फोटकांनी भरलेली गाडी प्रकरणाच्या कटात 5-7 जणांचा समावेश होता. सूत्रांनुसार, NIA ने याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात मुंबई पोलीस (Mumbai Police) दलातील आणखी काही अधिकाऱ्यांची देखील चौकशी होऊ शकते. त्यामुळे मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये खळबळ उडाली आहे. आता या घटनेची पाळमुळं कुठवर जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. एनआयएच्या तपासात आणखी एक माहिती समोर आली आहे ती म्हणजे ठाणे याठिकाणाहून आणखी 3 जणांच्या अटकेची शक्यता आहे. याप्रकरणी इनोव्हा गाडीतून जाणारे दोन्ही चालक आणि एका व्यावसायिकाला अटक होऊ शकते. (हेही वाचा - महाराष्ट्र सरकार वाझेंची नार्को टेस्ट करणार का?भाजप आमदाराचा उद्धव ठाकरेंना सवाल) तसंच, या पांढऱ्या इनोव्हा गाडीबाबत देखील एनआयएच्या तपासात मोठा उलगडा झाला आहे. NIA ने ही गाडी शोधून काढत ती NIA च्या मुंबई कार्यालयात आणली आहे. एनआयएचे हे मोठे यश मानले जात आहे. त्यामुळे गेले काही दिवस ज्या पांढऱ्या गाडीचे गूढ होते, ते संपुष्टात आले आहे.
First published:

Tags: Mumbai, Mumbai police, Sachin vaze, Terror attack, मुंबई पोलीस

पुढील बातम्या