Home /News /mumbai /

Mumbai: मालमत्ता कर वसूलीसाठी गेलेल्या BMC च्या टीमवर प्राणघातक हल्ला, मनपा अधिकाऱ्याचा डोळा थोडक्यात बचावला

Mumbai: मालमत्ता कर वसूलीसाठी गेलेल्या BMC च्या टीमवर प्राणघातक हल्ला, मनपा अधिकाऱ्याचा डोळा थोडक्यात बचावला

Mumbai News: मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मालमत्ता कर वसूली करण्यासाठी गेले असता हा हल्ला करण्यात आला आहे.

मुंबई, 24 मार्च : मुंबई महानगरपालिकेच्या टीमवर प्राणघातक हल्ला (attack on bmc team in Mumbai) करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील फोर्ट परिसरात (Fort area of Mumbai) ही घटना घडली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून थकीत असलेला मालमत्ता कर (Property Tax) न भरल्याने मनपाची टीम जप्तीची कारवाई करण्यासाठी गेली असता मालमत्ता धारकाकडून हल्ला करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मनपा अधिकाऱ्याचा डोळा थोडक्यात बचावला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई महानगरपालिकेच्या ए विभागातील अधिक्षक दशरथ घरवाडे हे मालमत्ता कर वसूली करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. संबंधित मालमत्तेचा मालक असलेल्या अश्विनकुमार शहा याने दशरथ घरवाडे यांना मारहाण केली आहे. या मारहाणीत 58 वय वर्षे असलेल्या अधीक्षक दशरथ घरवाडे यांच्या उजव्या डोळयाजवळ मार लागला आहे. वाचा : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण समिती अध्यक्ष आणि माजी उपसरपंच यांच्यात हाणामारी, घटनेचा LIVE VIDEO आला समोर या प्रकरणी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून माता रमाबाई आंबेडकर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारहाण करणाऱ्या तिघांपैकी एकजण पसार झाला आहे. तर एकाला पकडून माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. नेमकं काय घडलं? दशरथ घरवाडे यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, अश्विनकुमार शहा यांच्या मालकीच्या फोर्ट परिसरात एकूण तीन इमारती आहेत. त्यापैकी हमाम स्ट्रीट येथील किर्ती चेंबर्स इमारत क्रमांक 35 चा एकूण 43,76,467 रुपये इतका मालमत्ता कर गेल्या दहा वर्षांपासून थकीत आहे. त्या अनुशंगाने अश्विनकुमार शहा यांना 30 जून 2021 रोजी मालमत्ता कर भरण्याच्या संदर्भात मनपाने नोटीस दिली होती. त्यानंतरही त्यांनी कर भरला नाही. वाचा : डॉक्टर की बाऊन्सर? आरोग्य केंद्रात चपराश्याला अमानुष मारहाण, भंडाऱ्यातला VIDEO यानंतर 17 सप्टेंबर 2021 रोजी अटकावणी आणि जप्ती करण्याच्या संदर्भात मुंबई मनपाच्या ए विभागाकडून त्यांना नोटीस देण्यात आली. तरीही त्यांनी थकीत मालमत्ता कर भरला नाही. अखेर 23 मार्च 2022 रोजी सायंकाळच्या सुमारास दशरथ घरवाडे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत अश्विनकुमार शहा यांच्या इमारतीत दाखल झाले. पुढील 48 तासांत थकीत रक्कम करभरणा न केल्यास इमारतीचे सेव्हरेज लाईन बंद करण्यात येईल अशी नोटीस चिकटवली. यानंतर इमारतीच्या आवारात अश्विनकुमार शहा, त्यांचा कार चालक आणि ऑफिसमधील इसमाने दशरथ घरवाडे यांना घरेले. त्यांचे दोन्ही हात पाठीमागून पकडले आणि मारहाण केल्याचा आरोप दशरथ घरवाडे यांनी केला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: BMC, Crime, Mumbai

पुढील बातम्या