मुंबई, 05 फेब्रुवारी : मुंबईतील (Mumbai) मानखुर्द (Mankhurd ) येथील मंडाळे स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
आज दुपारी मानखुर्द येथील मंडाळे स्क्रॅप गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणताही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, आगीची तीव्रता भीषण आहे. धुराचे लोट दूरपर्यंत दिसून येत आहे.
#मुंबई - मानखुर्दमध्ये गोडाऊनला लागली भीषण आग pic.twitter.com/Zo5LDqrKcl
— News18Lokmat (@News18lokmat) February 5, 2021
या गोदामात आइल तसंच भंगाराची दुकानं आहे. त्यामुळे काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले आहे. आगीत अनेक दुकानं भक्ष्यस्थानी सापडल्याचे वृत्त आहे.
गोदामाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीमध्ये आगीमुळे खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा केला, पण यात त्यांना यश आले नाही.
आगी माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली आहे. अग्निशमन दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. आग विझवण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे.
(सविस्तर बातमी लवकरच)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.