मेट्रो ही मुंबईच्या गरजेचीच, हायकोर्टाने पर्यावरणवाद्यांना फटकारलं

मेट्रो ही मुंबईच्या गरजेचीच, हायकोर्टाने पर्यावरणवाद्यांना फटकारलं

मुंबईतील मेट्रो सेवा ही मुंबईची गरज आहे असं म्हणत मेट्रो ३ करता होणाऱ्या तिवरांच्या कत्तलीला विरोध करत याचिका करणाऱ्यांनी वस्तुतिथीचा विचार करावा अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारून काढलं आहे.

  • Share this:

08 जून : मुंबईतील मेट्रो सेवा ही मुंबईची गरज आहे असं म्हणत मेट्रो ३ करता होणाऱ्या तिवरांच्या कत्तलीला विरोध करत याचिका करणाऱ्यांनी वस्तुतिथीचा विचार करावा अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारून काढलं आहे.

मुंबई मेट्रो रेल काॅर्पेरेशननं मेट्रो ३ प्रकल्पासाठी १०८ तिवरांच्या झाडांची कत्तल करण्यासाठी मुंबई हायकोर्टात परवानगी मागितली होती. बाॅम्बे एनव्हायरनमेंटल अॅक्शन ग्रुपनं यापूर्वी तिवरांसंदर्भात केलेल्या याचिकेवर हायकोर्टाने तिवारींची कत्तल करायची असल्यास आपली परवानगी घेणं बंधनकारक असल्याचा आदेश दिला होता.

अॅक्शन ग्रुपच्या म्हणण्यानुसार मेट्रो ३ ची बीकेसी आणि धारावी ही स्टेशन्स सीआरझेड ३ च्या अंतर्गत येतात आणि अशा ठिकाणी भुयारी कामं करता येत नाही असं याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं. पण आपण तिवरांचं पुनर्रोपण करण्यास तयार असल्याचं MMRC च्या वतीनं कोर्टाला सांगण्यात आलं.

याचवेळी हायकोर्टानं मुंबईत मेट्रो सेवा ही तीस वर्षांपूर्वीच यायला हवी होती असं म्हणत मुंबईच्या वाहतुकीची समस्य पाहता मुंबईत मेट्रो सेवा आवश्यक आहे असं म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 8, 2017 07:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading