मुंबई, 09 जानेवारी : मुंबई महापालिकेच्या (mumbai municipal corporation) निवडणुकीचा पुढील वर्षी होणार आहे. पण आतापासूनच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. काँग्रेसने एकीकडे स्वबळाचा नारा दिला आहे. तर दुसरीकडे बृहन्मुंबई महापालिकेसाठी दोन आयुक्त असणे गरजेचे आहे. तशी मागणी आपण शहर विकास विभागाकडे केली असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख (Aslam Shaikh) यांनी दिली.
'मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशातील विविध भागांतून लोक रोजीरोटीच्या शोधात मुंबई शहरात येत असतात. याचाच परिणाम म्हणून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. वाढणाऱ्या लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याची जबाबदारी ही त्या शहरातील महानगरपालिकेची असते. परंतु, सध्या महानगरपालिकेसाठी एकच आयुक्त असल्याने नागरिकांचे प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित राहतात. शिवाय मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना विविध प्रशासकीय कामांसंदर्भात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथील पालिका मुख्यालयात यावे लागते नागरिकांची होणारी ही गैरसोय पाहता मुंबई शहर व उपनगरासाठी दोन पालिका आयुक्त असणं गरजेचे आहे' अशी मागणी अस्लम शेख यांनी केली.
50 वर्षीय विधवेवर GangRape; प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला स्टीलचा ग्लास
पी-उत्तर वॉर्डच्या विभाजनास राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिल्यानंतर आता पालिकेसाठीही दोन आयुक्तांची मागणी जोर धरू लागली आहे.
महापालिकेसाठी दोन आयुक्तांची पद निर्माण करण्यात आल्यास मुंबई उपनगरात राहणाऱ्या नागरिकांना प्रशासकीय व्यवहार करणं सोयीचे ठरणार आहे. सध्या मुंबई शहर व उपनगरसाठी दोन जिल्हाधिकारी आहेत याच पार्श्वभूमीवर दोन आयुक्तांची पद निर्माण करावीत अशी मागणी शेख यांनी केली आहे.
'बलात्कार करणाऱ्या आरोपींना भर चौकात लटकवलं पाहिजे'- कंगनाचं वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, भाजपने अस्लम शेख यांच्या या मागणीवरून कडाडून टीका केली आहे. 'मुंबईसाठी दोन आयुक्त मागणे म्हणजे, मुंबईला विभक्त करण्याचा प्रकार आहे' अशी टीका भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BMC