Elec-widget

Breaking: राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ठरलं; 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच'

Breaking: राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं ठरलं; 'मुख्यमंत्री शिवसेनेचाच'

स्थापनेसंदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 नोव्हेंबर: राज्यातील सत्ता स्थापनेसाठीच्या बैठका आणि चर्चांचे सत्र काही केल्या संपन्याची चिन्हे दिसत नाहीत. अशातच सरकार स्थापनेसंदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. शिवसेना(Shiv Sena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि काँग्रेस (Congress) यांच्या महाशिवआघाडी संदर्भात राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik)यांनी एक महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. राज्यात महाशिवआघाडीसे सरकार आल्यास त्या सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद गेल्यास राष्ट्रवादी आणि काँग्रेसला कसलीच अडचण नसल्याचे मलिक यांनी स्पष्ट केले.

राज्यात सरकार स्थापनेसंदर्भात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या दोन दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. याच दरम्यान राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. शिवसेनेने भाजपने शब्द न पाळल्याचे सांगत महाआघाडीसोबत सरकार स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला. आता या तिन्ही पक्षामध्ये सत्तेचा फॉर्म्युला कसा असेल यावर चर्चा सुरु आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी प्रथम राष्ट्रवादी सोबत चर्चा केल्यानंतर काल त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी देखील चर्चा केली होती. तिन्ही पक्ष एकत्र येऊन किमान समान कार्यक्रम निश्चित करतील आणि सत्तेचा वाटा कसा असेल हे देखील निश्चित करतील असे सूत्रांकडून कळते. शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी काल (बुधवार) रुग्णालयातून बाहेर येताच सेनेचाच मुख्यमंत्री होईल असे पुन्हा एकदा स्पष्ट केले होते. त्यानंतर भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका मुलाखतीत मुख्यमंत्रिपदाचे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचे म्हटले होते. शहा यांच्या या विधानाचा समाचार आज (गुरुवारी) सकाळी संजय राऊत यांनी नेहमी प्रमाणे पत्रकार परिषद घेऊन केला.

राजकारणात किमान नैतिकतेची अपेक्षा आहे. सुरू असलेली नैतिकता नाही. अमित शहा हे लोकसभा निवडणुका होईपर्यंत का बोलले नाहीत की समसमान सत्तावाटपाचं काही ठरलं नाही. आम्ही व्यापारी नाही. आम्ही शब्दाला जागतो, अशा शब्दात राऊतांनी शहा यांना उत्तर दिले होते. 'निवडणूक काळातच आम्ही वारंवार सांगत होतो की देवेंद्र फडणवीस हेच पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, तेव्हा शिवसेना का बोलली नाही,' असा सवाल अमित शहा यांनी केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शहा यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच कोणीतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये जाणीवपूर्वक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा गंभीर आरोपही राऊत यांनी केला आहे.

'आम्हाला पंतप्रधानांना खोटं पाडायचं नव्हतं. आम्ही असत्याचा आधार घेऊन कधी राजकारण केलं नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत सत्तावाटपाच्या गोष्टी ठरल्या. बंद दरवाजाआडची चर्चा शाहांनी मोदींना सांगितली नाही. शिवसेनेनं कधी राजकारणाचा व्यापार केला नाही. बंद दरवाजाआड दिलेली आश्वासनं जेव्हा पूर्ण हो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 14, 2019 01:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com